निपाणीत ड्रोन कॅमेऱ्यांची नजर :पोलिससह पालिकेकडून खबरदारीच्या सूचना निपाणी(वार्ता): शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.३) दुपारी पोलीस प्रशासनासह नगरपालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चिकोडीचे पोलीस …
Read More »संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरींची नॅशनल स्पर्धेसाठी निवड
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचा धावपटू प्रविण मनोहर गडकरी यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेंगळूर कंठीरव मैदानावर नुकतीच कर्नाटक स्टेट ज्युनिअर, सिनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा पार पडली. संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांनी १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत सहभागी होऊन द्वितीय क्रमांक पटकाविले आहे. प्रथम क्रमांक शशीधर बी. …
Read More »संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला २३ लाख रुपये नफा, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची १०८ वी सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उद्देशून बोलताना संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी म्हणाले, आमच्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला चालू आर्थिक वर्षात २३ लाख ६८ हजार ८० रुपये नफा झाला आहे. सभासदांना …
Read More »संकेश्वरात पंचमसालीचा जयजयकार…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री बसवेश्वर सर्कल, चन्नम्मा सर्कल ते गावातील प्रमुख मार्गे आज पंचमसालीची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला दिव्य सानिध्य कुडलसंगम लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजींचे लाभले होते. रॅलीत श्री बसवेश्वर महाराज की जय, पंचमसाली की जय, अशा जयघोषणा दिल्या जात होत्या. …
Read More »गर्लगुंजीसह तालुक्यात गौरीचे आगमन
खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर चाहुल लागते जेष्ठ गौरी आवाहनाचे आगमन शनिवारी दि. ३ रोजी गर्लगुंजीसह तालुक्यात अनेक खेडोपाडी उत्साहात साजरी झाली. शनिवारी दि. ३ रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर आगमन झाले. यावेळी घरातील तुळसी पासुन पावला पावलानी डोक्यावर गौरीची आगमन होते. विहिरीपासून महिलांनी गौरी डोकीवरून घेऊन घरात प्रवेश …
Read More »सौंदलगा परिसरात गौरीचे भक्तिमय वातावरणात स्वागत
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगासह परिसरात शनिवारी गौरीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गौरीच्या प्रतिष्ठापणेची तयारी महिलांनी जोरदार केली होती. गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरवाशींनी आल्या असून, प्रत्येक घरामध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये गौरीची गाणी, झिम्मा फुगडीचा फेर धरला जात आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक ठिकाणी घरोघरी गौरी नेण्यासाठी …
Read More »विद्यार्थ्यांनो कष्टाशिवाय पर्याय नाही : डॉ. सागर माळी
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुकुल विभागांतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन करताना विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या गोवा येथे प्राध्यापक म्हणून कार्य करणारे डॉ. सागर पांडुरंग माळी म्हणाले की, विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट केलेच पाहिजे म्हणजेच आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास कसा करावा अभ्यास करताना …
Read More »चापगाव फोंडेश्वर मंदिर परिसर होणार प्रकाशमय : उद्योजक मारुती पाटील यांची ग्वाही
खानापूर : चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरासमोर मोठा सव्वादोन लाख रुपये खर्चून हॅलोजन बल्ब बसवण्याची ग्वाही कौंदल गावचे सुपुत्र व पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक मारुती पाटील यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी ज्येष्ठांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. येत्या दोन महिन्यात काम पूर्णत्वाला नेईन, असे सत्कार प्रसंगी बोलताना …
Read More »दहावी परीक्षेत ध्येय, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच : आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील
खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु …
Read More »हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी) गावच्या समस्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, ग्रामस्थांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta