Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरींची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचा धावपटू प्रविण मनोहर गडकरी यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेंगळूर कंठीरव मैदानावर नुकतीच कर्नाटक स्टेट ज्युनिअर, सिनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा पार पडली. संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांनी १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत सहभागी होऊन द्वितीय क्रमांक पटकाविले आहे. प्रथम क्रमांक शशीधर बी. एल. अल्वास, द्वितीय क्रमांक संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी, तृतीय क्रमांक रोहित यांनी पटकाविले आहे. १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत ३५ धावपटूंनी भाग घेतला होता प्रविण गडकरी यांनी आजपावेतो तीन कि.मी,पाच कि.मी धावणेच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे पटकावली आहेत. त्यांने १५०० मिटर धावणेत देखील यश संपादन केले आहे.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रविण म्हणाला, बेंगळूर रुरल डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशनने नुकतीच कर्नाटक स्टेट ज्युनिअर सिनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा घेतली. त्यात आपण बागलकोट जिल्ह्यातून सहभागी झालो होतो. १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत आपणाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. आपण १५०० मिटर धावणेचे अंतर ४ मिनिटे ३६ सेंकंदमध्ये पूर्ण केले आहे. आपली निवड छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. लांब पल्ल्याच्या ३ आणि ५ कि.मी. धावणेत निपून आहे. १५०० मिटर धावणेचा देखील सराव करीत आहे. छत्तीसगड येथे
२७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपण निश्चितच चांगली कामगिरी करुन दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *