Saturday , December 13 2025
Breaking News

कर्नाटक

शॉर्टसर्किटने घराला आग; २५ आजाराचे नुकसान

  निपाणी (वार्ता): येथील जत्राट वेस ₹मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनाजवळ असलेल्या नवीन शेरखाने त्यांच्या घराला  दुपारी शॉर्टसर्किटने आग लागून त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य खाक झाले आहे. या घटनेत शेरखाने यांचे २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून तात्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत घटनास्थळावरून …

Read More »

पुण्यातील अपघातात शिरगुप्पीच्या तरुणाचा जागीच मृत्यू 

निपाणी (वार्ता) : पुण्याजवळील एका अपघातामध्ये सिद्धार्थ पांडुरंग जाधव (वय ४४  रा. माळभाग शिरगुपी) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सूत्रांच्या माहितीवरून असे समजते, सिद्धार्थ हा ट्रक ड्रायव्हर असून तो काल आपला मालवाहू ट्रक घेऊन पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत असता पुण्यापासून काही अंतरावर …

Read More »

खानापूरात टिप्परसह अवैध वाळू जप्त

  खानापूर : खानापूर पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त केल्याची घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील देसूर गावातून चोर्ल्याकडे एका टिप्परमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात होती. खानापूर पोलिसांनी विशिष्ट माहितीवरून छापा टाकून मालासह लॉरी जप्त केली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली आहे. हा टिप्पर एसजे डेव्हलपरचा असून त्याचा …

Read More »

खानापूर तालुक्यात कुंभार समाजाकडून नागपंचमीसाठी नागमुर्ती तयार

  खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे दरवर्षी होणार्‍या नागपंचमी सणासाठी खानापूर तालुक्यातील कुंभार समाजाकडून नागमुर्ती तयार केल्या जातात व घरोघरी या नागमुर्तीची मनोभावे पुजा केली जाते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी, सिंगीनकोप, तोपिनकट्टी, निट्टूर, गणेबैल, नंदगडसह अनेक गावातील कुंभार समाज नागपंचमीसाठी शेडू व काळी मातीचे मिश्रण करून त्या चिखलातून सुरेख अशा शेडूमिश्रीत मातीचे …

Read More »

बेळगावसह तीन ठिकाणी एनआयएचे छापे; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

  बेंगळुरू: एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. आज पहाटे उत्तर कन्नडमधील बेळगाव, तुमकूर आणि भटकळ येथे छापे टाकणाऱ्या एनआयएच्या पथकाने तीन ठिकाणी प्रत्येकी एक अशा तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.

Read More »

हदनाळमध्ये अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड

लाखो रुपयांचे नुकसान, घरांचा पंचनामा करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरांचा पंचनामा अद्याप झालेला नसून यावर्षी तरी पारदर्शी पंचनामा होणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हदनाळातील संभाजी रामू शेटके, खंडू धोंडी पाटील, …

Read More »

खानापूरात सहाय्यक कृषी अधिकारी मुल्ला यांचा निवृत्त निमित्त सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कृषी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला हे ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा कृषी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण होते. तर व्यासपीठावर सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला सपत्नीक, अधिकारी व्ही. जी. मुंचडी …

Read More »

भाजप युवा कार्यकर्ता नेट्टारू हत्येच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनेची निषेध फेरी व श्रध्दांजली

खानापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील भाजपचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनांनी खानापूरचे भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासुन शिवस्मारक चौकापर्यत निषेध फेरी काढली. यावेळी प्रवीण नेट्टारू यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, राज्याचे …

Read More »

अभियांत्रिकीत बंगळूरचा अपूर्व टंडन प्रथम

सीईटी परीक्षेचा निकाल, सर्व अभ्यासक्रमात बंगळूरचे विद्यार्थी अव्वल बंगळूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत बंगळूरच्याच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी सीईटी परीक्षेत मुलांनी अव्वल ठरत मुलीना मागे टाकले. २.१६ लाखांहून …

Read More »

हिरण्यकेशी नदीपात्रातील गोटूर बंधाऱ्यात मगरीचे दर्शन

  संकेश्वर : गोटूर बंधाऱ्याच्या पश्चिम दिशेस कर्नाटकच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीपात्रात संकेश्वर परिसरात सुमारे आठ फुटाहून अधिक लांबीची मगर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी नांगनूर येथील शेतकरी रामचंद्र कोकितकर यांनी नदीकाठी मगर फिरताना प्रत्यक्ष पहिली आहे. सदर मगर केव्हाही नदीपात्राबाहेर येऊ शकते त्यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या वर्षभरापासून …

Read More »