Monday , September 21 2026
Breaking News

पुण्यातील अपघातात शिरगुप्पीच्या तरुणाचा जागीच मृत्यू 

Spread the love
निपाणी (वार्ता) : पुण्याजवळील एका अपघातामध्ये सिद्धार्थ पांडुरंग जाधव (वय ४४  रा. माळभाग शिरगुपी) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांच्या माहितीवरून असे समजते, सिद्धार्थ हा ट्रक ड्रायव्हर असून तो काल आपला मालवाहू ट्रक घेऊन पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत असता पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या कापूरहोळ (नारायणपूर) फाट्याच्या जवळपास काही अंतरावर त्याचा अपघात झाला असून, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम चालू आहे. मयत सिद्धार्थ जाधव यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार असून घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *