कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण अंतरराज्यीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना …
Read More »कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
पंचकूला : हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कारमध्ये बसून विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. …
Read More »बॉलिवूड अभिनेता मुकूल देवचे 54व्या वर्षी निधन!
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचे निधन झाले आहे. २४ मे रोजी, वयाच्या ५४व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मुकूलच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याने ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकुल देवचा जन्म १७ सप्टेंबर …
Read More »छत्तीसगडमध्ये २७ माओवाद्यांचा खात्मा!
नारायणपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूर जिल्ह्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी सकाळी ११ वाजेपर्यंत २७ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »कॉंग्रेस सरकारने राबविल्या गरीबांना मदत करणाऱ्या योजना : राहुल गांधी
श्रीमंतानाच श्रीमंत करणाऱ्या भाजपच्या योजना, काँग्रेसचा साधना मेळावा बंगळूर : भाजप निवडक श्रीमंत लोकांना संपूर्ण पैसे आणि संसाधने मिळतील, अशा मॉडेलचे अनुसरण करत आहे, तर काँग्रेसच्या मॉडेलमध्ये पैसे बँक खात्यात आणि गरिबांच्या खिशात टाकले जात आहेत, असा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजपवर हल्लाबोल केला. राज्यातील काँग्रेस …
Read More »ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणाऱ्या नारळीकरांनी ‘व्हायरस’, ‘यक्षांची देणगी’ यांसारखी पुस्तके लिहिली जी खूप गाजली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, झोपेतच ते शांतपणे अनंतात …
Read More »कारचे सेंट्रल लॉक झाल्याने गुदमरून चार मुलींचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील द्वारपुडी गावात एक भयानक घटना घडली. कारमध्ये खेळत असताना गुदमरून चार मुलांचा मृत्यू झाला. उदय (8), चारुमती (8), करिष्मा (6) आणि मनस्वी (6) अशी मृतांची नावे आहेत. चारुमती आणि करिष्मा बहिणी आहेत, तर इतर दोघी त्यांच्या मैत्रिणी आहेत. द्वारपुडी गावातील चार मुली उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत होते, …
Read More »सोलापूरमध्ये आग दुर्घटना; मृतांचा आकडा 8 वर
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, मागील 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या …
Read More »दहशतवादी सैफुल्लाह खालीदची गोळ्या झाडून हत्या…
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता. नेपाळमध्ये हाता सक्रीय सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए …
Read More »हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील एका इमारतीला भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबाद : हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील गुलझार हाऊसजवळील एका इमारतीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चारमिनार जवळच्या या इमारतीमध्ये भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या प्रमाणात राहणाऱ्यांची संख्या असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta