Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू

  नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका धक्कादायक घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. कारण शास्त्री पार्क येथील एकाच घरातील ६ लोकांचा डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉईलमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यापैकी अनेकजण घरातील डास मारण्यासाठी किंवा त्यांना पळवण्यासाठी घरामध्ये कॉईल लावतात. पण याच कॉईलने सहा जणांचा …

Read More »

एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न, सामाजिक न्यायासाठी २० विरोधी पक्ष चेन्नईत एकत्र येणार

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून सोमवारी (दि. ३ एप्रिल) चेन्नई येथे सामाजिक न्याय परिषद आयोजित केली आहे. विविध राज्यात भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना या परिषदेसाठी निमंत्रित केले असल्याचे द्रमुकमधील सूत्रांनी सांगितले. या बैठकीला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल; ही नामुष्की ओढवलेले अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष

  पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे. अशा प्रकारची नामुष्की ओढवलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असलं तरीही नेमके आरोप काय …

Read More »

अमेरिकेच्या आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली, अनेक जणांचा मृत्यू

  अमेरिकेत आर्मीच्या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सची एकमेकांना धडक होऊन अपघात झाला असल्याची माहिती यूएस आर्मीने दिली आहे. ही घटना केंटकी येथे बुधवारी रात्री घडली. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स केंटकीमध्ये नियमित सरावादरम्यान उड्डाण करत होते, त्याचदरम्यान त्यांची टक्कर होऊन त्यांना आग लागली. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. …

Read More »

फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना; २५० जणांनी भरलेल्या बोटीला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ बेपत्ता

  दक्षिण फिलिपाइन्समध्ये गुरूवारी (दि. ३०) मोठी दुर्घटना घडली. २५० जणांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला तर, ७ जण बेपत्ता झाल्याची माहिती एपीएफ न्यूजने दिली आहे. बोटीला अचानक आग लागल्याने बोट बुडून ही दुर्घटना घडल्याचे फिलिपाइन्स प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फिलिपाइन्स कोस्ट गार्ड्स (PCG) ने …

Read More »

विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेतील आज (३० मार्च) चाच …

Read More »

सनातन धर्माला कोणत्‍याही प्रमाणपत्राची गरज नाही : सरसंघचालक मोहन भागवत

  नवी दिल्ली : सनातन धर्म फार पूर्वीपासून होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आपण आपल्या आचरणाने लोकांना ‘सनातन’ समजले पाहिजे. सनातन धर्म काळाच्या कसोटीवर उतरला असल्याने त्याला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रतिपादन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (दि. ३०) केले. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ‘संन्यास …

Read More »

रामनवमीच्या दिवशी इंदूरमध्ये मोठी दुर्घटना, मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण पडले

  इंदूर : देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून …

Read More »

कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म

  नवी दिल्ली : नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी चार बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नामिबियातून (दक्षिण आफ्रिका) १७ सप्टेंबर २०२२ …

Read More »

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव? विरोधकांसोबत पक्षपातीपणाचा आरोप

  नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तशा हालचाली विरोधी पक्षाच्या गोटात सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व निलंबित करणे आणि सभागृहात विरोधकांसोबत पक्षपाती करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष सोमवारी अविश्वास प्रस्ताव आणला जाऊ शकतो. गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने राहुल …

Read More »