Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

भावना गवळींचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच : राहुल शेवाळे

  नवी दिल्ली: भावना गवळी याच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद असून त्यांचा व्हिप हा सर्व 18 खासदारांना लागू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले. युतीबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी …

Read More »

थरारक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू

  हरियाणा : दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकार्‍याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण …

Read More »

वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटीच्या मुद्यांवरुन विरोधकांचा संसदेत प्रचंड गदारोळ

  नवी दिल्ली : वाढती महागाई, खाद्यान्नावरील जीएसटीसह इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी संसदेच्या उभय सदनात मंगळवारी प्रचंड गदारोळ घातला. नियमावलीनुसार संसदेत फलक दाखविले जाऊ शकत नाहीत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांना वारंवार बजावले. मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधी सदस्यांनी फलकबाजी व घोषणाबाजी चालूच ठेवल्याने अध्यक्षांनी …

Read More »

शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र

  नवी दिल्ली : गेल्या महिन्यात शिवसेनेत उभी पडल्यानंतर पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एका पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी …

Read More »

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : कोरोना मृतांच्या कुटुंबियांना कोणताही वेळ न दवडता भरपाईची रक्कम द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिले. संबंधित लोक तक्रार निवारण समितीकडे दाद मागू शकतात भरपाईची रक्कम दिली जात नसल्याची कोणाची तक्रार असेल तर संबंधित लोक तक्रार निवारण समितीकडे …

Read More »

राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान

  नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील 99.18 टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील 283 आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. …

Read More »

केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

  तिरुअनंतपुरम : भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून केरळमधील कन्नूमरमध्ये 31 वर्षाच्या युवकाला त्याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचा दुसरा रुग्ण सापल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती …

Read More »

बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; 2 महिलांचा मृत्यू

  सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या अपघातात इतर भाविक जखमी झाले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिलावती देवी (42, रा. हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गाव) व सुहागमती …

Read More »

वृंदा करात यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर

  सांगली : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह लोक विद्यापीठाचे संघटक कॉम्रेड सुभाष पाटील आणि सचिव कॉम्रेड सुभाष पवार यांनी दिली आहे. याबाबत कॉम्रेड पाटील म्हणाले, येत्या 6 ऑगष्ट रोजी दुपारी 1.30 …

Read More »

इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

  इंदूर : मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने …

Read More »