Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी …

Read More »

टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी …

Read More »

गोव्यातील पंचायत निवडणुका पावसाळ्यानंतरच, प्रशासक नेमणार!

पणजी : राज्यातील पंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यानंतर अर्थात तीन महिन्यानंतर घेतल्या जातील. कारण पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही आणि दुसरे कारण म्हणजे ओबीसी प्रभाग आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश. गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाबाबत ट्रिपल टेस्ट प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसा प्रस्ताव गोवा सरकारने राज्य निवडणूक आयोगाला दिलेला …

Read More »

ओबीसींची जनगणना करा, सत्य समोर येऊ द्या; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली. ओबीसींची जनगणना करण्यात यावी. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे, असे आव्हानही पवार यांनी दिले. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा …

Read More »

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एका शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेत मृत्‍युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ८ वर्षीय बंदुकधारी माथेफिरूने मंगळवार (दि.२४) रोजी एका शाळेत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला …

Read More »

गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध?

नवी दिल्ली : गव्हानंतर केंद्र सरकार आता साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. देशांतर्गत साखरचे वाढत चालेल्या दरांवर निर्बंध घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणार आहे. जवळपास १ कोटी टन इतक्या साखरेची निर्यात रोखली जाणार आहे. सहा वर्षांनंतर प्रथमच साखरेची …

Read More »

लाच मागणार्‍या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. …

Read More »

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत, भाच्याची ईडीसमोर कबुली

मुंबई : ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अलीशाह पारकरने …

Read More »

भारत-जपानमधील नाते आदराचे अन् ताकदीचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

टोकियो : क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी जपानमधील भारतीय नागरिकांना संबोधित केले. भारत आणि जपान दोन देशांतील संबंधावर बोलताना भारताच्या विकास प्रवासात जपानची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले आहे. मोदी म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा जपानमध्ये येतो, तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमाचा वर्षाव होत असल्याचे …

Read More »

ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी पूर्ण; वाराणसी कोर्ट उद्या देणार निकाल

वाराणसी : ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे …

Read More »