Tuesday , September 17 2024
Breaking News

गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीपासून कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सुधारित आदेश कोल्हापूर (जिमाका): ज्या जिल्ह्यात दि. 30 जानेवारी रोजी 18 वर्षावरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस व 70 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाने …

Read More »

कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्राणांतिक उपोषणास सुरूवात

कोल्हापूर (एस. के. पाटील) : कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नियमबाह्यपणे कायद्याचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे दिलेल्या पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदांच्या मान्यता तात्काळ रद्द कराव्यात या प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण कोल्हापूर येथील विभागीय …

Read More »

’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे

पारगड परिसराची अधिकार्‍यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …

Read More »

उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावले, मुजोर दौलत विश्वस्थ प्रशासनावर कारवाईची मागणी

चंदगड (वार्ता) : प्रा. नागेंद्र जाधव हे दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून 21 जून 2002 पासून कार्यरत आहेत. आपल्या सेवेला नियमित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात 2010 ते 2013 या काळात एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील High Court, Mumbai W.P. …

Read More »

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर : कोल्हापूरमधील काँग्रेस आमदाराचं निधन झाल्याची दुःखद बातमी आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने चंद्रकांत जाधव यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून …

Read More »

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने तरुणांची 18 लाखांची फसवणूक, शिप्पूरच्या बंटी-बबलीची करामत

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नेसरी परिसरातील दोघांना 18 लाख 8 हजार 996 रुपयांचा गंडा घालणार्‍या शिप्पूर तर्फ नेसरी येथील दोघा पती-पत्नी विरोधात नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍या अनेक गरजूवंतांची फसवणूक करणारी बंटी आणि …

Read More »

सतेज पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

अमल महाडिक यांची माघार कोल्हापूर : भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस धावली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान …

Read More »

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद …

Read More »

केंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा!

महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज कोल्हापूर : ‘सनातन धर्म’ एक महान धर्म आहे आणि याचा कुठलाही पर्याय या जगात नाही. याच आपल्या धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच या देशाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय …

Read More »

शिनोळी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर; बेळगावातील सहा जणावर गुन्हा दाखल

शिनोळी (एस. के. पाटील ) : मटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिनोळी (ता. चंदगड ) येथे चंदगड पोलिसांनी छापा मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले. …

Read More »