Wednesday , March 26 2025
Breaking News

अडकूर, सत्तेवाडी दरम्यान वाघाचे दर्शन; परिसरात खळबळ

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) जवळ दोन दिवसांदरम्यान हत्तीने धुमाकूळ घातला होता. हा विषय चर्चेला असतानाच आज सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता अडकूर-कानूर मार्गावर निकम व रेंगडे यांच्या शेताजवळ पटेरी वाघाचे दर्शन झाल्याचे शिक्षक राजू चौगुले यांनी अडकूर येथील काहींना कळवल्यानंतर या मार्गावर जा-ये करणाऱ्यांनी सतर्क राहावे. या भागात शेतीकडे सहसा जावू नये अशा आशयाचा मजकूर त्वरित व्हायरल झाला. ग्रामपंचायती जी तात्काळ याची दखल घेत तशा सुचना ग्रामस्थाना ध्वनिक्षेपकावरून दिल्या. आता हत्तीनंतर वाघाच्या दर्शनामुळे अडकूर व परिसरातील सर्वांना दक्षतेने आव्हान केले जात आहे. ज्या भागातून हा वाघ फिरला आहे तेथील पायाचे ठसे काहींनी मोबाईलद्वारे चित्रित करून पुरावा दिला आहे. कारण हत्तीच्या आगमनानंतर लगेच वाघाचा वावर यावर कदाचित कोणी विश्वास ठेवतील का? या शंकेमुळे ठशांचे चित्रण केले आहे. एकंदरीत अडकूर व परिसरातील सर्वांना दक्षतेने राहणे आवश्यक आहे. याबाबत चंदगड वन विभागाला कळवण्यात आले आहे.

—————————-
वाघ की तरस संभ्रम?
वाघ की तरस याची खात्री करावी लागेल असे चंदगडचे वनाधिकारी श्री. भोसले यांनी सांगितले. त्यानंतर आता नुकतेच वनाधिकारी भोसले हे आपल्या टीमसह अडकूरला रवाना झाले आहेत. त्यांच्या पहाणीनंतरच खरे काय ते समजेना आहे. या परिसरात असणाऱ्या सत्तेवाडी, उत्साळी, अलाबादेवी, शिरोली येथील मुले शेजारील गावामध्ये शिक्षणासाठी पायी ये -जा करतात. त्यांच्यामध्ये भितिये वातावरण निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मलिग्रे येथे महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने केला विधवा महिलेचा सन्मान…

Spread the love    आजरा : मलिग्रे ता. आजरा येथील अंगणवाडी व महिला बचत गटाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *