Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांचे निधन

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते गंभीर आजाराचा सामना करीत होते. हुक्केरी मतक्षेत्राच्या आखाड्यात संजय नष्टी यांच्या नावाचा उल्लेख केला जात असे. संकेश्वर हिरण्यकेशी नदीला महापूर आलेल्या प्रसंगी पुरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा आणि कोरोनाच्या संकट काळात गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांना आहार किट मिळवून देणारा नेता हरपला आहे. संजय नष्टी यांच्या पश्चात वडील, बंधू, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संकश्वरचे मिरची व्यापारी शिवकुमार नष्टी यांचे ते भाऊ असून नगरसेविका सविता नष्टी यांचे ते पती होत. आज सायंकाळी ५ वाजता संकेश्वर लिंगायत समाज रुद्रभूमित संजय नष्टी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *