Sunday , July 26 2026
Breaking News

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजले!

Spread the love

 

गडहिंग्लज : सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या जवानाच्या पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली असून अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे नूल (ता. गडहिंग्लज) गावचे असलेले अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात. अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते. दरम्यान, काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर आले आहेत. गुरूवारी (ता. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय, डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे कोणते तरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी अमर याने जोरात ओरडल्याने शेजारचे नागरिक त्यांच्या घरी आले. दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केला. त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावच्या नागरिकाच्या डोक्यात कशाने तरी मारून तेथून पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे व अमर यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर याच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथे महाप्रसादातून विषबाधा; २५० हून अधिक बाधित

Spread the love  नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *