Sunday , July 26 2026
Breaking News

समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रोपे व हँडवॉशचे वाटप

Spread the love

 

मुमेवाडी : वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा आदर्श संदेश देत मुमेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात आले.

यावेळी कुमार अवधूत घाटगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांना झाडांची रोपे देण्यात आली आणि शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम संयुक्त बजरंग दल, मुमेवाडी यांच्या सहकार्याने पार पडला.

तसेच कुमारी भार्गवी कांबळे यांनीही आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत शाळेला हँडवॉश भेट दिले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एल. एस. पाटील यांनी अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास शिक्षकवृंद, शालेय शिक्षण समितीचे सदस्य, पालक तसेच संयुक्त बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. पी. के. पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

नेसरी ग्रामस्थ मंडळ नेसरी, ता. गडहिंग्लज येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यतीचे आयोजन

Spread the love  नेसरी : नेसरी ग्रामस्थ मंडळ नेसरी, ता – गडहिंग्लज जि – कोल्हापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *