Sunday , September 20 2026
Breaking News

बेंगळूर ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगची चमक; दोन रौप्य, एक कांस्य पदक

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने बेंगळूर येथील बसवनगुडी जलतरण तलावात आयोजित ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचा जलतरणपटू कुमार तनुज सिंग याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत तनुजने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 30.64 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक मिळविले. तसेच 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये 2 मिनिटे 32.09 सेकंद वेळेसह दुसरे रौप्य पदक पटकावले. 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत 1 मिनिट 09.48 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदकाची कमाई केली.

या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तनुज सिंग याची पुढील महिन्यात ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे.

तनुज हा आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचा सदस्य असून त्याला एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलभत्ते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर आणि नगरसेवक नितीन जाधव यांचे प्रोत्साहनही त्याला लाभत आहे.

तनुजच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, राष्ट्रीय स्पर्धेतही तो अशीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *