Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प …

Read More »

फ्लाइंग शीख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा

नवी दिल्ली : फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे आत्ताच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी मिल्खा सिंग यांना दूरध्वनी करीत ते लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली.

Read More »

“फ्लाईंग सिख” मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक धावपटू तसेच फ्लाईंग सीख म्हणून ओळखले जाणारे 91 वर्षीय मिल्खासिंग यांचे चंदीगडमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.मिल्खा सिंग यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने …

Read More »

कोरोना लसी खासगी रुग्णालयांना विकल्या : प्रकाश जावडेकरांचा आरोप

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ४०० रुपयांप्रमाणे कोव्हॅक्सिनचे डोज पंजाबला उपलब्ध करून दिले होते. परंतु, पंजाब सरकारने त्यांची २० खासगी रुग्णालयांना विक्री केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी इतरांना शहाणपणा शिकवू नये, असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लगावला. पंजाब सरकारने कोरोना लसींसदर्भात मोठा गैरव्यवहार …

Read More »

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …

Read More »

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

नवी दिल्ली : केरळच्या दक्षिण भागात मान्सून आज सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा …

Read More »

“मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा”; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारनं मोठा झटका दिला आहे. डॉमिनिकातील स्थानिक कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान डॉमिनिका सरकारनं चोक्सीची याचिका सुनावणी योग्य नसून त्याला भारताकडे सोपवण्यात यावं असं म्हटलं आहे.  सुनावणीपूर्वी मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं की, …

Read More »

कर्नाटकात कांही सवलतीसह लॉकडाऊन निर्बंध कायम

मुख्यमंत्र्यांची घोषणा : निर्यात संबंधीच्या व्यवसायांना परवानगी बंगळूरू : राज्यातील लॉकडाऊनच्या भविष्याविषयी असलेल्या कटाक्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी कांही कडक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाव्हायरस पूर्णपणे नियंत्रणाखाली आला नाही आणि ग्रामीण भागात अजूनही प्रकरणे जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, त्यांनी कांही क्षेत्राना सवलत देण्यात येणार …

Read More »

मोठी बातमी ! विषारी दारू पिल्यामुळे तब्बल 85 जणांचा मृत्यू; 33 जणांना अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात विषारी दारू पिल्याने तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला आहे. अलीगडमधील करसुआ गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांचा …

Read More »

सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द!

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आज (दि. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बोर्ड परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत आज (दि. १) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बारावीची …

Read More »