कोलकाता : कोलकात्याच्या हेस्टिंग्ज क्रॉसिंग परिसरातील भाजप कार्यालयाजवळ 51 क्रूड बॉम्ब (देशी बॉम्ब) आढळून आले आहेत. हे सर्व बॉम्ब एका पोत्यामध्ये होते. याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब निकामी केले.
या परिसरात बॉम्ब ठेवण्याचा उद्देश काय आहे, ते कोणी ठेवले, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कोलकाता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्कॅनिंग करत आहेत.
दरम्यान, सापडलेले सर्व बॉम्ब कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येते. निष्क्रिय करण्यात आलेले हे बॉम्ब अँटी राउडी सेक्शनने ताब्यात घेतले आहेत.
