बेळगाव : सध्या देशात व राज्यात कोरोनासारख्या रोगराईने हैदोस घातला असून सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुद्धा या कोरोना महामारीत आपल्या ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये कोविड आयसोलेशन किट देऊन जनतेच्या पाठीशी आरोग्य लक्ष्मी या रूपाने खंबीर उभे राहून जनतेची अखंड सेवा करीत आहेत. व त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत आज आमदार सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी सुद्धा आपल्या मित्रमंडळी समवेत गणेशपूर येथील स्मशानभूमीत साफसफाई करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याकामी मोहन सांबरेकर, सुनील सुर्वे, राहुल कनगुटकर, प्रदीप तानजी, दिनेश लोहार, राजू दाडगलकर, पिंटू देसाई या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …