खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.
यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी श्रीफळ वाढविले.
कोरोना महामारी यावर्षी कोणतेच सोहळे साजरे करता आले नाही. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने करण्यात येत आहे. कोरोना काळात तालुक्यातील कोरोना योद्ध्यांनी आपले जीव धोक्यात घालुन सेवा बजावली. त्यांचे कार्य महान आहे, असे विचार व्यक्त केले.
सोहळ्याला आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …