बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्यावतीने वतीने कोरोना काळामध्ये मोफत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. प्रमुख्याने बेळगाव शहरामध्ये कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहून इतर सामाजिक संस्थांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवेत ठेवल्या होत्या. पण इतर आजार, प्रामुख्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस, पॅरॅलिसिस, गरोदर स्त्रिया, आर्थोपेडिक आजार अशा 157 रुग्णांची गैरसोय दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्यावतीने वतीने सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे टाळण्यात आली.
प्रमुख्याने पॅरॅलिसिस पेशंटसाठी नागरमुन्नोळी, मुरगुड, संगोळी या भागामध्ये बेळगाव तालुक्यातील रुग्णांना मोफत ने-आण करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजनची सोय तसेच गरीब लोकांना धान्य वाटप व देखील करण्यात आले.
कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार देखील कोरोना नियमावलीनुसार करण्यात आले.
मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा देण्यात आली. यासाठी मंदिराचे ट्रस्टी अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, विवेक पाटील, राहुल कुरणे, मंदिरातील सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, दौलत जाधव या सर्वांचे सहकार्य लाभले.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …