Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

डीएमएस पीयु कॉलेज नंदगडमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवड

  खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पीयु कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 सालाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पदवी पूर्व विभागाच्या आदेशानुसार कॉलेजमध्ये मतदार साक्षरता संघ स्थापन करण्यात आला असून या संघाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व आणि योग्य उमेदवार निवडीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे …

Read More »

सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत उद्या निवेदन सादर करणार

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा सोमवार दिनांक ८ जुलै रोजी पार पडली. खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीतील ठराव व निर्णयानुसार उद्या बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर तहसीलदारमार्फत कर्नाटक राज्य माननीय मुख्यमंत्री यांना कर्नाटक राज्य नोकरांच्या सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत …

Read More »

सार्वजनिक आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावा अन्यथा तीव्र आंदोलन

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा खानापूर : राज्य सरकारने शासकीय तथा निमशासकीय इमारतींवर त्रिसूत्रीय धोरणानुसार मराठीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. कर्नाटक शासनाने देखील व्यावसायिक आस्थापनावर ६० टक्के कन्नड तर ४० टक्के स्थानिक भाषेत नामफलक लावण्याचे निर्देश दिले आहेत असे असताना खानापूर शहरात नव्याने होत असलेल्या हायटेक बस स्थानक …

Read More »

पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना गणेबैल नाक्यावर टोल माफी द्या

  खानापूर ब्लॉक काँग्रेसची मागणी खानापूर : पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकत्यांच्या गाड्यांना टोल माफी देण्यात यावी, यासाठी गणेबैल टोल नाक्यावर खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात वारकऱ्यांना वारीसाठी जाता-येता संपूर्ण टोलमाफी आहे त्याच धर्तीवर गणेबैल टोल नाक्यावर सुद्धा वारकऱ्यांना माफी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात टोल नाक्याचे …

Read More »

प्रसाद फार्मसीच्या सहकार्याने हलशीवाडी येथे डेंग्यू लसीकरण

  खानापूर : पावसाळ्यात संसर्गजन्य आधार मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ देसाई यांनी केले आहे. बेळगाव येथील प्रसाद फार्मसीच्या सहकार्याने हलशीवाडी येथे डेंग्यू लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांना देसाई यांनी मार्गदर्शन केले पावसाळ्यात आणि ठिकाणी पाणी साचून डास वाढतात …

Read More »

चोर्ला घाटात कार अपघात; बेळगावच्या युवकाचा मृत्यू

  खानापूर : मित्रांसोबत गोव्याला जात असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आपटली. या अपघातात संकेत बबन लोहार (वय. 26 रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर, बेळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत मित्रांसोबत गोव्याला जात होता. दरम्यान कारची रस्त्याकडेला …

Read More »

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी बोलाविण्यात आले आहे. पुढील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन उभारणेबाबत, प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणेबाबत, कार्याचे विकेंद्रीकरण व …

Read More »

खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी

  बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. विकेंडला या भागातील धबधबे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. बेळगावात मुसळधार पाऊस, नद्या, धबधबे ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधबा पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बटावडे …

Read More »

सार्वजनिक आस्थापनांवर मराठीत भाषेत फलक लावावेत यासंदर्भात सोमवारी खानापूर समितीची बैठक

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक आस्थापनांचे मराठीत नामकरण करून तसे फलक लावावेत यासंदर्भात यापूर्वी परिवहन महामंडळ, खानापूर, बेळगांव, हुबळी कार्यालयांना यासंबंधीत निवेदन दिले आहे. तसेच …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

  खानापूर : आज शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, जळगेहट्टी, चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ, शीवोली,का, हेब्बाळहट्टी, लालवाडी, कौंदल, झाडनावगे, हेब्बाळ,जे.सी.एच. शाळा नंदगड व संत मेलगे शाळा नंदगड, कसबा नंदगड, भत्तीवडे या …

Read More »