Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी संयोजित पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात टाऊन प्लॅनिंगच्या अध्यक्ष पदासाठी एकूण ९ जणांची फेर निवड झाली आहे. त्यामध्ये येथील टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. पाटील यांनी आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत टाऊन प्लॅनिंगच्या अथॉरिटी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पाटील यांची पुन्हा निवड झाल्याने कार्यकर्त्यातून जल्लोष करण्यात आला.
संयोजित पाटील यांची दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने १५ मार्च २०२३ रोजी टाऊन प्लॅनिंग अथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत निपाणी शहर आणि उपनगरातील लेआउट आणि बांधकामाबाबत विशेष लक्ष देऊन सर्व कामे सुरळीत मार्गी लावली आहेत. याशिवाय टाऊन प्लॅनिंगला २.३० लाखाचा निधी मंजूर झाला होता. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून जव्हार तलावातील पाणीपुरवठ्यासाठी या निधीचा वापर करण्याबाबत त्यांनी बैठकीत माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला आहे. त्यामुळे या कामाला आता सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी निपाणी टाऊन प्लॅनिंगच्या कार्यक्षेत्रात केवळ निपाणी शहर आणि उपनगराचा समावेश आहे याशिवाय अथणी आणि रायबाग टाऊन प्लॅनिंग मध्ये हे ते कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक विजयालक्ष्मी बाळेहोसूर यांचे सहकार्य लाभले. यापूर्वी नेते मंडळींनी आपल्यावर विश्वास ठेवून टाऊन प्लॅनिंगची धुरा दिली होती. त्याला पात्र राहून आपली जबाबदारी पार पडली आहे. आता पुन्हा निवड केल्याने या पुढील काळातही टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून निपाणी रायबाग आणि अथणी भागात प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे प्रतिक्रिया संयोजित उर्फ निकु पाटील यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *