Monday , September 21 2026
Breaking News

रक्तासारखा लाल ‘ब्लड मून’… ढगाळ वातावरणात बेळगावकरांना घडला ‘ब्लड मून’ नजारा

Spread the love

 

बेळगाव : यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज अवघ्या काही वेळापूर्वी पार पडले आहे. बेळगाव परिसरातील नागरिकांनाही आज सायंकाळी ब्लड मूनचा ढगाळ हवामानात खगोलप्रेमींना ब्लड मूनचा नजारा पाहायला मिळाला.

रक्तासारखा लाल ‘ब्लड मून’
आजचे ग्रहण हे केवळ चंद्रग्रहण नसून ते ‘खग्रास चंद्रग्रहण’ होते. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येतो, तेव्हा तो काळसर न दिसता गडद तांबूस किंवा लाल रंगाचा दिसतो. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘ब्लड मून’ म्हणतात. हे दृश्य पाहणे खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असते.

ग्रहणाच्या वेळेस चंद्र किंचित लाल दिसतो, म्हणून त्याला रक्त चंद्र असेही म्हणतात. भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू झाले होते, पण यावेळेस चंद्र भारतात दिसणार नव्हता. भारतात चंद्रोदय संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.32 वशशयावेळेस ग्रहणाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. चंद्रग्रहण संध्याकाळी 6:46 वाजेपासून ते 6:47 वाजेदरम्यान संपेले, म्हणजे भारतात केवळ 15 ते 20 मिनिटांसाठी ग्रहण दिसले. जळगाव परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते त्यामुळे सायंकाळी चंद्रग्रहणाच्या काळात ढगाळ वातावरणात नागरिकांनी ‘ब्लड मून’ नजारा पाहण्याची पर्वणी साधली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *