Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमर गुरव

  उपाध्यक्षपदी अजित कांबळे तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची निवड कोगनोळी : निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सन 2023 सालाकरिता अमर गुरव यांची, उपाध्यक्षपदी अजित कांबळे यांची तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कोगनोळी (ता. निपाणी) येथील हॉटेल मधुबनमध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …

Read More »

इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

प्रियांका खांडके यांचे मार्गदर्शन : ४०० विद्यार्थ्यांची तपासणी निपाणी (वार्ता) : येथील इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लबतर्फे सीएमसी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबीर पार पडले. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून त्यांना टूथब्रशचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रियांका खांडके उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

रक्तदान करून सहकार्य करा

निपाणी रोटरी क्लबचे आवाहन : रक्ताचा तुटवडा निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून रक्तदात्यांची संख्या घटली आहे. पण अपघात, शस्त्रक्रिया व इतर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील रोटरी क्लबला रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन येथील रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गेल्या २८ वर्षापासून येथील …

Read More »

स्वच्छतागृहात जादा रकमेच्या आकारणीवरून बसस्थानकात ‘आप’चे आंदोलन

निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहामध्ये स्त्री व पुरुषाकडून कंत्राटदाराकडून अवाजवी रक्कम घेतली जात जात आहे. याबाबत बऱ्याचदा आगारप्रमुखाकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर या घटनेचे गांभीर्य ओळखून आम आदमी पक्षाच्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत सदर घटने बाबत आगारप्रमुखांना भेटून हा प्रकार थाबविण्यास सांगितले. बसस्थानकात स्त्रियांकडून लघुशंकेसाठी ५ …

Read More »

संस्कारासाठी पालकांचे प्रबोधन आवश्यक

डॉ. स्नेहल पाटील : पडलिहाळ दृढसंकल्प कार्यक्रम निपाणी (वार्ता) : आजच्या आधुनिक काळात मुलांच्या प्रबोधनापेक्षा त्यांच्या पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.  मुलांच्यामध्ये उत्तम पद्धतीचे संस्कार रुजवण्यासाठी पालकांमध्येच खऱ्या अर्थाने प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त पडलीहाळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी  जयंतीनिमित्त ‘ज्योत प्रबोधनाची, …

Read More »

सम्मेद शिखरजी दर्शनाने चारशे तीन करोड उपवासाचे फळ

विपूल हवले : शिखरजी यात्रा नियोजन बैठक कोगनोळी : पवित्र सम्मेद शिखरजी भावपूर्ण दर्शन केल्याने 48 भावात मुक्ती मिळते. सम्मेद शिखरजी दर्शनाने चारशे तीन करोड उपवासाचे फळ मिळते. जैन समाजातील पवित्र समजल्या जाणारी सम्मेद शिखरजी यात्रा जन्माला येऊन एकदा तरी करावी. ग्रामपंचायत सदस्य राजगोंड टोपान पाटील यांनी गेल्या वर्षी 130 …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

६०० विद्यार्थ्यांनी केली कला सादर : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचे ५० वे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे अधिव्याख्याते डॉ. रघुनाथ कडाकणे, निपाणी रोटरी अध्यक्ष दिलीप पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या.  डॉ. रघुनाथ …

Read More »

ढगाळ हवामानामुळे सौंदलगा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

    सौंदलगा : सौंदलगा व परिसरात एक नगदी पीक म्हणून कांदा पिक शेतकरी घेत असतात सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात कांदा या पिकाची लागण केली जाते. साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कांदा पिकाची लागवड केली जाते. कांद्यास थंडीतील वातावरण अनुकूल असते त्यामुळे थंड वातावरण साधारणपणे कांदा हे पीक चांगले …

Read More »

सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी मगरींचे दर्शन

  सौंदलगा : सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या म्हसोबा मंदिर जवळील यमगरणी व नांगनूर मधून येणाऱ्या ओढ्याजवळ दोन मगरी आढळून आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सौंदलगा येथील वेदगंगा नदीकाठी येथील शेतकरी मुरली पाटील, जगदीश यादव, नंदू काळुगडे, निवृत्ती काळुगडे हे आपल्या कुटुंबासहित गवत कापण्यासाठी गेले असता‌ त्यांना …

Read More »

कोगनोळी येथे सहा एकर ऊस जळून खाक

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या टोलनाक्याजवळ माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टोल नाक्याजवळ माने मळ्यात सर्वे नंबर 652, 653, 654 मध्ये अनिल शामराव माने, नंदकुमार मळगे, शशिकांत राजाराम …

Read More »