16 हजार ध्वजांचे उत्पादन : साळुंखे गारमेंटच्या उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. घरोघरी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या ध्वजाच्या निर्मितीमध्ये निपाणीकरांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पुरविल्या जाणार्या ध्वजांचे उत्पादन निपाणी येथील …
Read More »चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली
बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेजमधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत 16245 क्युसेक्स पाण्याचा …
Read More »नगारजी, पठाण यांचा बागवान समाजातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी माजी सभापती सद्दाम नगारजी व चिक्कोडी जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी शेरगुलखान पठाण यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बागवान समाजातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष जुबेर बागबान (शादो) उपाध्यक्ष खलील चावलवाले सेक्रेटरी शौकत बागबान संचालक जुबेर सरदार बागबान भाई, जब्बार …
Read More »आप्पाचीवाडी फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सुदैवाने जीवितहानी टळली कोगनोळी : केरळहून मुंबईकडे आल्ले घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. यामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्याजवळ घडला. याबाबत घटनास्थळावरुन व …
Read More »जत्राट – भिवशी पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
निपाणी (वार्ता) : जत्राट – भिवशी पुलाखाली रविवारी सकाळी ३० ते ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आज सकाळी सातच्या सुमारास नदीकाठच्या परिसरात गेलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून अज्ञात मृतदेह वाहून आल्याचा प्रकार दिसून आला. या घटनेची …
Read More »विद्यार्थ्याने जोपासली शैक्षणिक बांधिलकी!
निपाणी : सध्याचे युग हे सायन्स युग म्हणून ओळखले जाते, त्यामुळं शिक्षण घेणे हे फार सोपे झालेलं आहे, इंटरनेटच्या माध्यमात गुरफटून युवा पिढी आपल्या शाळेला विसरत आहेत. पण याला अपवाद ठरलेला आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अजूनही मी विद्यार्थी आहे ही भावना मनात ठेऊन अमलझरीच्या यश दादासाहेब …
Read More »तहसीलदारांच्या निरोपावेळी कर्मचारी गहिवरला!
डॉ. मोहन भस्मे यांना निरोप : बंगळूरु येथे बढती निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार डॉ. मोहन भस्मे हे दीड वर्षापासून येथील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, कोरोना महापूर शहर विविध समस्यांना तोंड देत सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यांना बंगळुरु येथे बढती मिळाली आहे. त्यानिमित्त त्यांचा महसूल …
Read More »लिंगायत वस्तीतील बोरगांववाडीत अनोखा मोहरम!
५०८ वर्षाची परंपरा कायम : उद्याज मोहरमचा मुख्य दिवस निपाणी (विनायक पाटील) : बोरगाववाडी हे निपाणी तालुक्यातील धार्मिक-संस्कृती जोपासणारे छोटे गांव आहे. हे गांव लिंगायत समाजाचे असून गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही. तरीही लिंगायत लोक मोहरम साजरा करतात. या सणाला ५०८ वर्षाची परंपरा असून सोमवारी (ता.८) मुख्य दिवस आहे. …
Read More »निपाणीच्या एकाकडून दीड लाखाच्या गुटख्यासह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
कागल पोलिसांची कारवाई : रत्नागिरीचा आरोपीही ताब्यात निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी पान मसाला विक्रीला बंदी आहे. तरीही निपाणी सीमाभागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कागल पोलीसांकडून पान मसाला व सुगंधी तंबाखु गुटखा विक्री करणेसाठी घेवून जाणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख …
Read More »सौंदलगा येथील हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हायस्कूलमध्ये बैठकीचे आयोजन
सौंदलगा : सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. 21 /6 /1973 रोजी या हायस्कूलची स्थापना सौंदलगा येथे करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल असून या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाचे एक केंद्रबिंदू म्हणून या हायस्कूलकडे पाहिले जाते. या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 21/6/2022 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta