खानापूर : खानापूर तालुका म्हणजे अतिजंगलाने व्यापलेला तालुका, त्यातच मुसळधार पावसाचा तालुका. त्यामुळे तालुक्याच्या जंगल भागाच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान खुप कष्टाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी सुध्दा खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, गावच्या नागरिकांना अजुनही रस्ता नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यातून येण्यासाठी पुल नाही. पावसाळा आला की या भागातील …
Read More »कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी
बंगळुरू : उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना कर्नाटकात घडलेली आहे. न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला (पीआरओ) फोनद्वारे ही धमकी देण्यात आली असून, धमकीचा मॅसेजही व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला. कर्नाटक उच्च न्यायालयाचे पीआरओ के. मुरलीधर यांनी यासंदर्भात बंगळुरु पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १२ …
Read More »खानापूर तालुक्यातील अंगणवाडी अर्जदारांची गुरुवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ४९ आणि मदतनिसांच्या ८४ जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार …
Read More »यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी लक्ष्मीबाई कांबळे तर उपाध्यक्षपदी दिग्विजय निंबाळकर
निपाणी (वार्ता) : तवंदी, अंमलझरी, गव्हाण आणि यरनाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अंमलझरीच्या लक्ष्मीबाई आकाराम कांबळे तर उपाध्यक्षपदी यरनाळ येथील दिग्विजय निंबाळकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी काम पाहिले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. नूतन अध्यक्ष लक्ष्मीबाई कांबळे यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त …
Read More »जत्राट ग्रामपंचायत अध्यक्ष राणीताई कांबळे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : जत्राट येथील ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा राणीताई राघवेंद्र कांबळे यांचा निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फौंडेशन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षा कांबळे यांनी साकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जनतेच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी स्वतः लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जत्राट ग्रामस्थांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी …
Read More »गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील
उपाध्यक्षपदी लक्कवा हुणसे; समविचारी मंचमधून निवड निपाणी (वार्ता) : गळतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या राजू उर्फ अलगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या लक्कवा हुणसे यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन समविचारी मंच स्थापन करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी करण्यात आल्या. तसेच अडीच वर्षाच्या काळात निम्मा काळ अध्यक्ष, उपाध्यक्षांची …
Read More »लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्राम पंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी
उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : लखनापूर-पडलीहाळ ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या बेबीजान शिरकोळी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी निवड झाली. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाले त्यामुळे या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी जी.डी. मंकाळे यांनी केली. यावेळी …
Read More »कुर्ली-भाटनांगनूर वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
कोगनोळी : कोकण पट्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे व कुर्ली परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या पावसामुळे नदीकाठावरील पीके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच राहिल्यास महापूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. …
Read More »खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!
बेळगाव : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी (25 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. खानापुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि पीयू महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read More »खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान; घराची पडझड, लाखोचे नुकसान
खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta