Tuesday , August 25 2026
Breaking News

बेळगाव शहर उपनगरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील श्रीनगर आणि सुवर्णसौध या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांमध्ये चौथ्या त्रैमासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे येत्या रविवारी (८ मार्च) शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हुबळी विद्युत पुरवठा कंपनीच्या शहर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३३ केव्ही श्रीनगर उपकेंद्राच्या देखभाल कामासाठी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वीज बंद राहील. यामध्ये प्रामुख्याने विश्वेश्वरैया नगर, श्रीनगर, आंजनेय नगर, महांतेश नगर, अशोक नगर, आयसीएमआर आणि चन्नम्मा सर्कल या फिडर्समधील बँक ऑफ महाराष्ट्र परिसर, रेड्डी भवन, जिल्हाधिकारी निवासस्थान, जिल्हा पंचायत कार्यालय, पोलीस लाईन, सिव्हिल हॉस्पिटल, आरएलएस कॉलेज, कॉलेज रोड आणि क्लब रोड परिसरातील वीजपुरवठा खंडित असेल. तसेच जाधव नगर, उधमबाग, हनुमान नगर आणि अनगोळचा काही भाग या वेळेत अंधारात राहणार आहे.

दुसरीकडे, ११० केव्ही सुवर्णसौध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या भागांतही सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज नसेल. यात आलरवाड, सुवर्णसौध लाईन १ व २, बसवेश्वर सर्कल, शहापूर, जोशी गल्ली, सराफ गल्ली, आचार्य गल्ली आणि मारुती नगर या भागांचा समावेश आहे.

या कालावधीत यडियुरप्पा मार्ग, साई कॉलनी, हलगा रोड आणि हरिपाका कंपाउंड परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *