Saturday , June 20 2026
Breaking News

दागिने लांबवणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठा कॉलनीतील रहिवासी निर्मला मिलिंद सावंत यांनी ४ मार्च रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती.

बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा तातडीने तपास करत कॅम्प पोलिसांनी निपाणी येथील एका महिलेला अटक केली आहे.

या चोरीचा छडा लावण्यासाठी एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद ओणकुद्रे आणि पीएसआय आर. आय. सनदी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने संशयावरून सविता संजू लोंढे (वय ४६, रा. बुद्ध नगर, निपाणी) हिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने दागिने चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी महिलेकडून २२.८२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये सोन्याची साखळी, अंगठी आणि कानातील झुमके यांचा समावेश असून, या दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ६४ हजार रुपये इतकी आहे.

पीएसआय आर. आय. सनदी, पीएसआय ए. रुक्मिणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली असून, पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीविरोधी महामोर्चासाठी येळ्ळूरमध्ये मशाल मोर्चा; शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणूक काढून मध्यवर्ती महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *