Friday , March 6 2026
Breaking News

कर्नाटक

मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करणार आज १४ वा अर्थसंकल्प!

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करत असलेला हा 14वा विक्रमी अर्थसंकल्प आहे. त्यामुळे साहजिकच नवीन सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या बजेटकडून लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी 12 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. याद्वारे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचे …

Read More »

विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने सोलापूरच्या भाजी विक्रेत्याचा निपाणीत मृत्यू

  निपाणी (वार्ता) : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला डीपी मधील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती ज्योत्याप्पा गोलभावी (वय ३२ रा. सोलापूर-संकेश्वर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

खानापूर समिती पदाधिकारी निवडीचा तिढा सुटेल!; निमंत्रकांच्या भूमिकेकडे लक्ष

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीचा तिढा अधिक गुंतताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाचे पुरते पानिपत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. हा पराभव मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा होता. निवडणुकीनंतर चिंतन बैठक बोलावणे गरजेचे …

Read More »

खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने व्याधी मुक्त जीवन

  डॉ. जी. एस. कुलकर्णी; रोटरी क्लबमध्ये डॉक्टर्स डे निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्याला जेवण पद्धतीही कारणीभूत आहे. उतरत्या वयात कर्करोग, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, पेशींची कमतरता अशा अडचणी उद्भवतात. सुखी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे मत डॉ. जी. …

Read More »

निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण तारळे

  उपाध्यक्षपदी राजेश तिळवे: एक वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : येथील निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, उपाध्यक्षपदी राजेश तिळवे तर खजिनदारपदी श्रीमंदर व्होनवाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी केली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या नूतन क्लब सेवा …

Read More »

दोन ट्रॅक्टर चोरांना अटक; हुक्केरी पोलिसांची कारवाई

  हुक्केरी : ट्रॅक्टर चोरी प्रकरणी हुक्केरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हुक्केरी तालुक्यातील गौडवाड गावातून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला. याप्रकरणी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता ट्रॅक्टर चोरांना अटक केली आहे. पीआय एम. एम. तहसीलदार, बेळगावचे एसपी आणि अतिरिक्त …

Read More »

निपाणी गटशिक्षणाधिकारीपदी बेनाडीच्या महादेवी नाईक रुजू

  निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे …

Read More »

एटीएम मशीनला आग; रोख रक्कम जळून खाक

  हुक्केरी : एटीएम मशीनला अचानक लागलेल्या आगीत रोख रक्कम जळून खाक झाली. हुक्केरी शहरातील नवीन बस स्थानकानजीक असलेल्या कसाईखाना मार्गावर इंडिया एटीएममध्ये ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळाची दाखल होईपर्यंत एटीएममधील सर्व रोख रक्कम जाळून खाक झाली होती. शॉर्टसर्किटने ही …

Read More »

खानापूर हेस्काॅम खात्याचे नागरिकांना आवाहन

  खानापूर : खानापूर हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात गेल्या दोन महिन्यापासून वीज बिल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांतून वीज बिल भरण्यासाठी जादा खिडकीची मागणी होत होती. मात्र १ जुलै पासून हेस्काॅम खात्याची वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईनव्दारे, फोन पे, गुगल पे आदी सेवा उपलब्ध आहे. तेव्हा घरी बसल्याच हेस्काॅम खात्याची …

Read More »

कब्बूर- बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत आढळला मृतदेह; खूनाचा संशय

  चिक्कोडी : कब्बूर ते बागेवाडी दरम्यान असलेल्या कालव्यानजीक एकाचा खून करुन मृतदेह टाकण्यात आलेला प्रकार उघडकीस आला आहे. कब्बूर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या शिरहट्टीकोडी येथील रहिवासी भीमाण्णा कल्लाप्पा मुन्नोळी (वय 51) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री खून करुन मृतदेह कब्बूर ते बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत असलेल्या कालव्या शेजारी टाकण्यात …

Read More »