Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे

प्रा. शिरगावकर, निपाणीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुक प्रक्रियेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामध्ये निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत चिकोडी येथील आरडी महाविद्यालयातील …

Read More »

खानापूर आम आदमीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार : अध्यक्ष भैरू पाटील

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असुन येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा उमेदवारही खानापूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकी लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी बोलताना माहिती दिली. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. …

Read More »

काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

  म्हैसूर : कर्नाटकमध्ये १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जाहीर केली जाईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. कोलार या दुसऱ्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी अथवा नाही याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, याचा त्यांनी …

Read More »

रमेश जारकीहोळी यांच्यामुळे भाजपच्या उमेदवार निवडीत अडचण

  बंगळूर : भाजपच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत बेळगाव आणि किनारपट्टी भाग वगळता राज्यातील उमेदवारांची यादी पूर्ण झाली असून ती यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठवण्यात आली आहे. बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, राज्य प्रभारी अरुण सिंग यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित …

Read More »

कोट्यावधीची रोकड, सोन्या, चांदीचे दागिने जप्त

  निवडणुक आचारसंहितेचा बडगा बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनियमितता रोखणे, राज्यभर चेकपोस्ट उभारणे, वाहनांची तपासणी कडक करणे यावर करडी नजर ठेवली आहे. कागदपत्रे नसलेली अनधिकृत रक्कम आणि मतदारांना देण्यासाठी गोळा केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. कोप्पळ, …

Read More »

शिवकुमारविरुद्धच्या सीबीआय चौकशीच्या स्थगितीला मुदत वाढ

  बंगळूर : बेकायदेशीर मालमत्ता संपादन प्रकरणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरुध्दच्या सीबीआय चौकशीला देण्यात आलेली स्थगितीची मुदत कर्नाटक उच्च न्यायालयाने सहा एप्रिलपर्यंत वाढविली आहे. न्यायमूर्ती के. नटराजन यांच्या अध्यक्षतेखालील एकल सदस्यीय खंडपीठाने, काँग्रेस नेत्याने त्याच्याविरुद्धची कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, अंतरिम मनाई …

Read More »

खानापूरात भाजपकडून डॉ. सोनाली सरनोबत यांचे नाव आघाडीवर

  खानापूर : खानापूर विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. विठ्ठल हलगेकर हे जरी भाजपचे प्रबळ दावेदार असले तरी नियती फौंडेशनच्या अध्यक्षा भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना ग्रामीण भागातील महिला वर्गाची पहिली पसंती आहेत. तथापि भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद कोचेरी हे देखील भाजप उमेदवारीसाठी इच्छुक …

Read More »

खानापूरच्या ‘त्या’ सूर्याजी पिसाळांचा मध्यवर्तीच्या बैठकीत जाहीर निषेध

  बेळगाव : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीत खोडा घालून बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे कुठेही असा प्रकार झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. असा कडक इशाराही देण्यात आला आहे. मध्यवर्तीच्या बैठकीत खानापूर येथील समितीत बेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबाबत चर्चा झाली. यावेळी …

Read More »

एकाच कुटूंबातील चौघांची मंगळूरात लॉजमध्ये आत्महत्या

  कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय बंगळूर : मंगळुरू येथील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. म्हैसूरमधील विजयनगर येथील देवेंद्र (वय ४६), त्यांची पत्नी आणि अनुक्रमे १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींचा आत्महत्या केलेल्यांमध्ये समावेश आहे. देवेंद्रने कथितरित्या मंगळुरमधील के. एस. राव रोडवरील करुणा रेसिडेन्सी येथील …

Read More »

विजयेंद्र शिकारीपूरमधून, ‘वरुणा’तून नाही : येडियुरप्पांचे स्पष्टीकरण

  बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुनरुच्चार केला आहे की मुलगा विजयेंद्र यांनी वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यांनी यावेळी मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहावे. आज म्हैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले की, हायकमांडने विजयेंद्र यांना वरुणमधून उमेदवारी देण्याचे मान्य केले …

Read More »