खानापूर : खानापूर तालुक्यातील देवलट्टी गावाला सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देवलत्ती गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज समस्येची दखल घेऊन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांना पत्र पाठविले. देवलत्ती गावातील सध्याची गर्लगुंजी वीजवाहिनी …
Read More »शहरवासीयांच्या पाण्यापेक्षा खेळालाच महत्त्व
नगरसेवक विलास गाडीवड्डर : शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये २४ तास पाणी योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्यानंतर येथील नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. या पाच वर्षाच्या काळात नगराध्यक्षासह सभागृहाला उर्वरित १० टक्के काम पूर्ण करता आले नाही. त्यांच्या या …
Read More »कृतीतून महिलांचा आदर व्हावा : योगिता कांबळे
मानवाधिकार संघटनेतर्फे महिला दिन निपाणी : स्त्रियांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून सक्षम बनावे. दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलांनाही घरातील कामे करण्याच्या सवयी लावून मुलींचा व स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार रूजवावेत. आई, बहीण, पत्नी व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भूमिका जगत असतात. फक्त महिला …
Read More »आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
केंद्रीय पथक बंगळुरात दाखल; अधिकारी व राजकीय पक्षांशी चर्चा बंगळूर : राज्यात निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असतानाच, निवडणूक आयोगही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे आज तीन दिवसांसाठी राज्यात आगमन झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुंजी विभागात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी गुंजी विभागात संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. सुरूवातीला गुंजी माऊली देवीचे दर्शन घेऊन संपर्क दौऱ्याला सुरूवात करण्यात आली. भालके बी.के., भालके पी.एच. तसेच कामतगा येथे संपर्क दौरा करून जनजागृती करण्यात आली. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेत आगामी …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार द्या
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना वेळेत पगार होत नाही. त्यामुळे स्वच्छता कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळेत स्वच्छता कामगारांना पगार द्यावा. तसेच नोकरीत कायम करून स्वच्छता कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छता कामगारांनी केली. मागील बैठकीत चिफ ऑफिसराना वाहनाची …
Read More »अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त मातृवंदना उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (ता. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शमहिला पालकांना आमंत्रित करून मातृ वंदना उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून महिला रोग तज्ञ डॉ. उत्तम पाटील, प्रतिभा पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त खानापूरच्या जनता आधार सौहार्द सोसायटीच्या संचालकांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जनता आधार सौहार्द सोसायटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने संचालिका सौ. कल्पना सावंत, व सौ. सविता गडाद या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता आधार सौहार्द सोसायटीचे चेअरमन व खानापूर तालुका आप आदमी पक्षाचे सचिव शिवाजी गुंजीकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला …
Read More »शेंडूरमधील शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखणार
राजू पोवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : दीड वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी सर्वांच्या संमतीने दहा फूट रस्ता आपल्या शेतामध्ये सोला होता. सध्या या गावामध्ये पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प आलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता, नोटीस न पाठविता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या गावातील …
Read More »खानापूर तालुका अखिल भारतीय किसान संघ यांच्यावतीने बैठक संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अखिल भारतीय किसान संघ यांच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक खानापूरात नुकताच पार पडली. यावेळी बैठकीला मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष विवेक मोरे, सुरेश हंचनाळकर उपस्थित होते. तर बैठकीला तालुका अध्यक्ष अशोक गौडा पाटील, (चिकदिनकोप), उपाध्यक्ष शंकर पाटील (बिदर भावी) सेक्रेटरी एस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta