Friday , May 1 2026
Breaking News

श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीचा स्तवनिधीमध्ये रविवारी प्रतिष्ठापना सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रमात (गुरुकुल) रविवारी (ता.८) श्रीमद्देवादिदेव श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ नूतन मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव सोहळा होणार आहे. यावेळी परिसरातील श्रावक- श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन कमिटीने केले आहे.

गुरुकुल प्रणालीचे प्रवर्तक श्री २०८ गुरूदेव समंतभद्र महामुनिराज यांच्या पावन सानिध्याने पुनित झालेल्या पवित्र भुमिवर संतशिरोमणी श्री २०८ आचार्य विद्यासागर महाराजांच्या च् आशिर्वादाने सहजसागरजी महाराज यांच्या निर्देशनात स्तवनिधी येथे पाषाण निर्मित नुतन भव्य जिन मंदिर निर्माण होत आहे. या मंदिरातील वेदीवर 8 फुट उंचीचे पद्मासनातील सहस्त्रफणी श्री १००८ भगवान पार्श्वनाथांची मूर्ती रविवारी (ता.८) सकाळी ११.२५ वाजता विराजमान होणार आहे. तरी श्रावक श्राविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून पुणे संपादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पहाटे ५ वाजता मंगल वाद्यघोष, सकाळी ७ वाजता मंदिरात अभिषेक, शांतीधारा व शांतीनाथ विधान होईल.सकाळी ९ वाजता पीठयंत्र आराधना व शांती होम विधी, सकाळी वाजता वेदीशुध्दी व यंत्र स्थापना कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० वाजता कळंबी येथील प्रतिष्ठाचार्य वास्तुशिरोमणी, ज्योतिषाचार्य दिपक महावीर उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली श्री मद्देवादिदेव श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगांव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी रुक्साना अफराज यांची बिनविरोध निवड

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा भारती वसवाडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *