Saturday , March 7 2026
Breaking News

कर्नाटक

निडगल शाळेत कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ पारितोषिके वितरण

  खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव व जीएसएस काॅलेजचे प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी मराठी हायर प्राथमिक शाळा, निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवीच्या …

Read More »

खानापूरचा लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना व्यवसायिक सेवा पुरस्कार प्रदान

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील व डुक्कुरवाडी येथील लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना नुकताच व्यावसायिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोटरी ई क्लब, डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे शनिवारी दि. २८ रोजी जी एस एस कॉलेज, बेळगाव येथे व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक सेवा पुरस्कार …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट!

  खानापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी एम. के. हुबळी येथे “विजय संकल्प” यात्रा भाजपच्या हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत पार पडली. या विजय संकल्प यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जगदिश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपा राज्याध्यक्ष नवीन कुमार कटिल, आदी मंत्री उपस्थित …

Read More »

आईची तीन कोवळ्या मुलांसह आत्महत्या

  विजयपुर येथील दुर्दैवी घटना विजयपुर : विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पीडित महिलेने तिच्या तीन कोवळ्या मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. गीता रामू चौहान (३२) तिची तीन मुले सृष्टी (६), किशन (३), समर्थ (४) …

Read More »

बोरगाव येथील खत कारखान्यास आग लागून पाच कोटीचे नुकसान

  खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …

Read More »

खानापूर समितीची विस्तृत कार्यकारिणी लवकरच!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलीकमामा चव्हाण, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, मारुती परमेकर, विलासराव बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका समितीची …

Read More »

खानापूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याकडून आंदोलनाचा इशारा

  खानापूर : खानापूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली आहे. एक कोटी खर्चून विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत नादुरुस्त झाली आहे. इमारती बाजूने असलेली भिंत देखील कोसळलेली आहे. त्यामुळे वसतिगृह म्हणजे दारुड्यांचे ठिकाण झाले आहे. तरीही इमारत परत एकदा …

Read More »

संविधानमुळे राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला

  प्राध्यापक प्रकाश नाईक : कोगनोळीत व्याख्यान कोगनोळी : स्वतंत्र पूर्व काळात राजा फक्त राणीच्या पोटाला जन्माला येत होता. 26 जानेवारी 1950 पासून राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ नगर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित व्याख्यानात …

Read More »

बनावट मार्क्सकार्ड रॅकेटचा पर्दाफाश; बंगळुरमध्ये पाच संस्थांवर छापेमारी

  बंगळूर : केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) बनावट मार्क्स कार्ड रॅकेट चालवणाऱ्या पाच संस्थांवर छापे टाकले आणि भारतातील नामांकित विद्यापीठांच्या सहा हजार बनावट गुणपत्रिका जप्त केल्या. गेल्या काही दिवसांत सीसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मार्क्स कार्ड रॅकेटच्या पोलिस तपासात बंगळुरच्या विविध भागांतील पाच संस्था या रॅकेटमध्ये सामील असल्याचे समजते. पोलिसांनी …

Read More »

अमलझरीची तीन वर्षानंतर सब रजिस्टर ऑफिसला नोंद

आपच्या पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमधून समाधान निपाणी (वार्ता) : अमलझरी गावाची निपाणी सब रजिस्टर कार्यालयामध्ये नोंद व्हावी, यासाठी ग्रामस्थांकडून तीन  वर्षांपासून लढा चालू होता. तरीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा पक्ष प्रमुखाकडून या विषयी निवेदन देऊन सुध्दा दखल घेतली गेली नाही. अमलझरी ग्रामस्थ त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सहन करत विवंचनेत पडले …

Read More »