माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत काँग्रेसचा युवा मेळावा निपाणी (वार्ता) : काँग्रेस सत्तेमध्ये असताना निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली नागरिकासह तरुणांना बोलवण्याचे काम करीत आहेत, असा घनाघाती आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. येथील मराठा मंडळ …
Read More »घोटगाळीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी येथे जवळपास 15 ते 18 लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना गुरुवारी पार पडली. यावेळी मंदिराचा कळसारोहण भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी …
Read More »खानापूरात एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये बेळगाव एलआयसी ऑफ इंडिया ब्रांच वन व सॅटलाईट ऑफिस खानापूर यांच्यावतीने एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून एलआयसी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील एम डी आर टी एजंट …
Read More »हणबरवाडी ग्रामस्थांचा प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा
पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी …
Read More »एम. के. हुबळी येथील विजय संकल्प यात्रेसाठी बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे ; भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांचे आवाहन
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एम. के. हुबळी येथे विजय संकल्प यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी भागातून बहुसंख्य नागरिकांनी अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत …
Read More »खानापूरात संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त गुरूवारी दि. २६ जानेवारी रोजी आयोजित भव्य बाईक रॅलीला युवकाचा भव्य प्रतिसाद लाभला. गुरूवारी सकाळी रॅलीचे सुरूवात खानापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून करण्यात आली. प्रारंभी …
Read More »कुन्नूरमध्ये रविवारपासून ‘अरिहंत चषक’ शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा
उत्तम पाटील : आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी निपाणी (वार्ता): कुन्नूर (ता. निपाणी) येथील श्री. दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी (ता.३०) रात्री अंतिम सामना …
Read More »खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संतोषी गुरव पथसंचलनात
खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील 25 कर्नाटका बटालियन संचलित एनसीसी विभागाची कॅडेट कुमारी संतोषी शिवाजी गुरव ही विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनी चालणाऱ्या पथसंचलनात सहभागी झाली आहे. कुमारी संतोष हिने याआधी राज्य पातळीवर परिश्रम घेत असताना बेळगाव, धारवाड, बल्लारी, मंगलोर, बेंगलोर इत्यादी ठिकाणी जवळजवळ सहा …
Read More »मताला सहा हजार रुपयाचे अमिष; आमदार, मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षाविरुध्द कॉंग्रेसची तक्रार
बंगळूर, ता. २५: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मतदारांना आमिष दाखविल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तक्रार पत्रावर स्वाक्षरी केली …
Read More »प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिलेबी, हार, गजराचे स्टॉल
२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta