Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

दक्षिणेतून काँग्रेसचे उमेदवार प्रभावती मास्तमर्डी चावडी, उत्तरमधून आसीफ शेठ

  बेळगाव : काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव दक्षिण मतदार संघातून प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना तर उत्तर मतदारसंघातून माजी आमदार फिरोज शेठ यांचे बंधू आशिष (राजू) शेठ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अथणी मतदारसंघातून …

Read More »

पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी; भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव

  बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने संपूर्ण राज्यातील २२४ मतदार संघासाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे ओबीसी राज्य उपाध्यक्ष किरण जाधव यांनाही उमेदवारी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर किरण जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या बेळगाव दक्षिण …

Read More »

राष्ट्रीय पक्षातील “मराठा” नेत्यांनी “समिती”च्या पाठीशी रहावे

  बेळगाव : सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांची गळचेपी होत असते. कर्नाटक सरकारला मराठी भाषेची काविळ आहे. त्यामुळे मराठी भाषिकावर कुरघोडी करत असते. कर्नाटक सरकारची समिती नेते व कार्यकर्त्यांवर करडी नजर असतेच मात्र राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांना देखील सावत्रपणाची वागणूक देत असल्याची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारी यादीतून …

Read More »

खणगावजवळ मुख्य जलवाहिनी फुटली!

  बेळगाव : बेळगाव व उपनगरामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आज (शनिवार) सकाळी बेळगावला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी खणगाव गावातील मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अचानक फुटली. यामध्ये 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडून आजूबाजूच्या शिवारामध्ये पाणीच पाणी झाले. उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती L&T …

Read More »

महामानव डॉ. बाबासाहेबांना जायंट्स मेनचे अभिवादन

  बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या देशाची वाटचाल ज्या घटनेवर चालते त्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती, शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता ते दीन-दुबळ्यांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या विचार तत्वांवर प्रत्येकाने वाटचाल केल्यास जिवन समृद्ध होईल असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल …

Read More »

बेळगाव तालुका समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  बेळगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील सरचिटणीस, ऍड. एम. जी. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व पूजन करण्यात आले. …

Read More »

घटप्रभा नदीकाठी पोहायला गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू

  बेळगाव : घटप्रभा नदीकाठी पोहायला गेलेल्या सहा पैकी चार जणांचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. दुपारी 2.15 च्या सुमारास ही घटना घडली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंडगोड तालुक्यातील शिरगेरी गावातील चार जण धुपदाळ मंदिराजवळील घटप्रभा नदीत बुडाले. मृतांमध्ये संतोष बाबू (19), अजय बाबू जोरे (19), कृष्णा बाबू जोरे (19), आनंदा …

Read More »

मारुती नाईक यमकनमर्डीतून समितीचे अधिकृत उमेदवार

  बेळगाव : यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून मारुती तीपण्णा नाईक यांची घोषणा करण्यात आली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात शुक्रवार दिनांक 14 रोजी ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठी मराठी प्रबोधितर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून हे कवी संमेलन घेण्यात आले. प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर यांनी …

Read More »

दक्षिण मतदारसंघात तगडा उमेदवार : ज्येष्ठ पत्रकार शिवराज पाटील

  बेळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत म. ए. समितीतर्फे खानापूरमधून मुरलीधर पाटील, बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले तर बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून सर्व संमतीने निवड झाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा. गेल्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघ वगळता सर्वच मतदार संघांमध्ये बंडखोरी झाल्यामुळे म. …

Read More »