Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्र

“कुणीही यावं, टपली मारून जावं आणि आम्ही…”, उद्धव ठाकरेंचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्र

  मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर …

Read More »

कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार

  मुंबई : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन? अफवा की सत्य…

    मुंबई : : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी …

Read More »

पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत

  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली. पोलिसांतून …

Read More »

कर्नाटकाकडून दिशाभूल करण्याचे काम : जयंत पाटील

  मुंबई : सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. जत तालुक्यातील 65 गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे …

Read More »

महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडची गावं घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

  मुंबई : “महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधला आहे. आपण त्या गावांना …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

  मुंबई : सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो

  मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी …

Read More »

वन्य प्राण्याची कत्तल करणाऱ्या व्यक्तींवर चंदगड पोलिस व वनविभागाची संयुक्त कारवाई

  चंदगड : आज सकाळी पहाटे 3 च्या सुमारास तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांचे पाहणीपथक रात्री गस्त घालत असताना एका पोल्ट्री जवळ 10-12 व्यक्ती चार वाहनासोबत संशयितरित्या दिसून आले. यावेळी पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांना हटकले असता यांतील सर्व व्यक्ती पळून जाऊ लागल्यामुळे त्यातील दोन दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सदर व्यक्तींकडून …

Read More »

25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार

  कोल्हापूर : आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांना आता मैदानातचं जाब विचारला जाईल, असा …

Read More »