नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पममात आले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून असून शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या जीवाला धोका आहे, असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले असून, यासाठी संजय राऊत …
Read More »शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा …
Read More »बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा, सीआरपीएफचे जवान तैनात
मुंबई : बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून …
Read More »फुटीरवाद्यांना माफी नाही, १५ ते १६ आमदार संपर्कात : आदित्य ठाकरे
मुंबई : फुटीरतावादी लोक शिवसेनेत नकोत. त्यांना आता माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे स्पषट करत बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १५ ते १६ आमदार संपर्कात आहेत, असा दावा युवासेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि.२६) येथे केला. ते सांताक्रुझ येथील युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होते. …
Read More »दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज
आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा …
Read More »‘शाहू छत्रपती’ चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्वदूर पोहचतील : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार भावी पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य आणि …
Read More »शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ६ ठराव मंजूर; बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली असून, शिवसेनेने शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवत पुढच्या लढाईच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या ठरावानुसार बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत. बैठकीनंतर बंडखोरांवर संध्याकाळपर्यंत कारवाई होईल, असे संकेत संजय …
Read More »आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आमच्याकडेच दोन तृतीयांश बहुमत : दीपक केसरकर
गुवाहाटी : आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भासवले जात आहे; परंतु आम्ही सर्वजण आजही शिवसेनेत आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२५) पत्रकरांशी संवाद साधताना केला. नोटीस पाठवून …
Read More »एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली; चर्चेसाठी शिष्टमंडळ स्थापन करणार
मुंबई : शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात सुरू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नवी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, …
Read More »कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढला मोर्चा
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे. राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामिल झाल्याने कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta