जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी उपचार घेतले होते. पण सरकार जोपर्यंत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबतचा तोडगा …
Read More »हडलगे येथे शालेय विद्यार्थ्यांना मारहाण; सर्वत्र एकच खळबळ
नेसरी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीस अटक तेऊरवाडी (एस के पाटील) : येथूनच जवळ असलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे एका पोल्ट्री चालकाने पोल्ट्रीचे नुकसान केल्याच्या रागातून तीन शालेय विद्यार्थ्यांना बांधून मारहाण केल्याची तक्रार नेसरी पोलिसात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील नेसरी पोलिसात अशोक शिवाजी तेऊरवाडकर (वय 38 वर्षे, व्यवसाय …
Read More »मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावली
जालना : मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात …
Read More »महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. डिबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी …
Read More »कोल्हापूर शहरातील रस्ते, वाहतूक आणि नालेसफाईची कामे गतीने करा
राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना कोल्हापूर (जिमाका): नियोजन विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी देण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतला. यावेळी त्यांनी शहरातील रस्ते, वाहतूक, नालेसफाई, प्रॉपर्टी कार्ड वितरण आदी कामांबाबत गतीने …
Read More »मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापूरातून पाठिंबा
आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून …
Read More »सगेसोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू : मनोज जरांगेंचा थेट इशारा
जालना : सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन आमदारांना पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात ते उपोषणाला बसणार आहे. पोलिसांनी …
Read More »तुमचे काम सुरू ठेवा, अमित शहांचा फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर …
Read More »आंदोलन चिरडण्याच्या मागे लागू नका; जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री, फडणवीसांना इशारा
जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम …
Read More »एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta