मुंबई : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, ‘आरक्षणा’च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष केला जात आहे. …
Read More »मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह आझाद मैदानात गुलाल उधळणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच (26 जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता आहे. सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. मराठा जमाजाचे नेते …
Read More »गडकोट मोहिमेदरम्यान दरीत कोसळून हुपरीतील तरूणाचा मृत्यू
हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक (२५ वर्षीय) तरुण दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हुपरी ता. हातकणंगले येथील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सागर पांडुरंग वाईगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …
Read More »अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
मुंबई : सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज वाशी येथील शिवाजी चौकात मराठ्यांच्या अफाट जनसमुदायासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी सरकारसमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत. त्यात प्रमुख म्हणजे आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना १०० टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे. सरकारी नोकरीत आमच्या जागा राखून ठेवा. ही मागणी …
Read More »अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
शहराच्या विकासासाठी मंदिर परिसर विकास आराखड्याला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, …
Read More »बेळगाव सीमाप्रश्न महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी विसरत चालली आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमाभागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे पण महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी हा बेळगाव सीमाप्रश्न विसरत चालली आहे. या बेळगाव सीमासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणी द्वारे समाज जागृती करणे महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून …
Read More »रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडी कार्यालयाबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर …
Read More »अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा …
Read More »पंतप्रधान मोदींकडून गुजरात आणि देशात भिंत उभं करण्याचे काम; ठाकरेंचा वार
नाशिक : निवडणूक आल्याने पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत, हे असलं हिंदुत्व मान्य नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »मिरची तोडणीला निघालेल्या मजुरांची नाव उलटली, 6 महिला बुडाल्या
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. स्थानिकांच्या मते, सहा महिलांचा बुडून मृत्यू झाला असेल. सहा महिला नदीमध्ये पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तात्काळ सुरु …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta