चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या घरावर झाड पडुन रू. १ लाखाचे नूकसान झाले असून मारूती आप्पा नाईक यांच्या घराची भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा कानूर बुद्रुकचे तलाठी खूपसे, पोलीस पाटील अशोक मटकर, कोतवाल व ग्रामपंचायत सरपंच तसेच कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तरी या शेतकरी बांधवांना लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
Check Also
शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन
Spread the love शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा …