शिनोळी : मराठा आरक्षण प्रश्र्नी सुरू असलेल्या न्याय मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्या अभूतपूर्व उपोषणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी ता. चंदगड येथे आज दि. ३१ रोजी मरगुबाई मंदिर समोर सकाळी १० वा. साखळी उपोषणास सुरुवात केली. या उपोषणाच्या पहिल्या दिवशी प्रा. नागेंद्र कृष्णा जाधव व संदीप अर्जुन भोगण यांनी उपोषण ठिकाणी बैठक मारून उपोषण केले. यावेळी गावातील अनेक मराठा बांधवांनी उपस्थिती लावली.
यात प्रामुख्याने शंकर वैजनाथ भोगण, अमोल भोगण, उमेश भोगण, प्रकाश करडे, नारायण करडे, विनोद मजुकर, संघर्ष प्रज्ञावंत, संजय भोगण, राजाराम करडे, शिवकुमार पुजारी, गोविंद आडाव, महेश जाधव, केदारी आंदोचे, राणबा पाटीलसह चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील प्रांत ग्राहक पदाधिकारी सागर पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत गावडे, राजेंद्र किरमटे, सौ. मंगला वाके आदी मंडळीनी उपोषणस्थळी भेट देवून मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला पाठींबा जाहीर केला.