चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव सावतवाडी भागांमध्ये गेले चार दिवस टस्कर हत्तीनी धुमाकूळ घातला आहे. आठ ते दहा एकर शेतीचे नुकसान झाले असून यांमध्ये भात, नाचना, ऊस यां पिकांचा समावेश आहे.
गोविंद गावडे, राम धुरी, एकनाथ धुरी, अर्जुन धुरी, भरत गावडे, संजीवनी धुरी, अर्जुन रेडकर, अर्जुन सावंत या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी वनविभागाने भेट देऊन पाहणी दौरा करत पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यावेळी वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, वनपाल दयानंद पाटील, वनमजूर गुंडु देवळी उपस्थित होते. तर दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकर्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई नाही दिल्यास वनखात्याच्या विरोधात कायदेशीर मार्गाने मोर्चाने आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष व गावचे माजी सरपंच सटूप्पा पेडणेकर यांनी दिला आहे.
Check Also
देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र
Spread the love गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …