चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन अनेकदा येथील कोविड रुग्णांसाठी रोजच्या रोज एकवेळचे जेवण देऊन येथील रुग्णांची सेवा करण्याचे कार्य नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केले आहे. जनसेवा हीं ईश्वरसेवा मानून आपल्या लोकांसाठी नेहमी ते सहकार्य करतं आहेत. लोकांना मास्क वाटप, गरजूना साहित्य वाटप, तसेच रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणे, विविध उपक्रम राबविणेे यांसारख्या कार्यामुळे ते रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत.
नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी कोविड काळात केलेली मदत हीं रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी असल्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.