खानापूर : बेळगावपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला धनगरवाडा या वाड्यात 22 ते 25 घरे आहेत. कोरोनामुळे या गावातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या कोरोना काळातही या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर यांनी धान्याचे वाटप केले होते आणि आताही या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटे, पोहे, रवा व धान्य यांचे वाटप केले यावेळी सुरेंद्र अनगोळकर, दीपक बसरीकट्टी, निलेश पाटील, रोहन आर्यन हे उपस्थित होते. यावेळी सुरेंद्र अनगोळकर यांनी कर्नाटक सरकार आणि दानशूर व्यक्तीना विनंती केली की या भागात सोलार लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच बेळगाव शहरांमध्ये जशी व्यवस्था पुरविण्यात येत आहे तसेच या गावांमध्येही या लोकांची व्यवस्था करावी.
Check Also
करंबळच्या युवकाचा गोवा येथे अपघाती मृत्यू
Spread the love फोंडा (उसगाव गोवा) : फोंडा गोवा येथे दुचाकीस्वाराची आणि कारची समोरासमोर धडक …