Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची मोठी खेळी, पवार यांच्या खेळीने भाजपला खिंडार पडणार?

  पुणे : अजित पवार यांनी आमदारांचा एक गट घेऊन राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मधल्या काळात शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्यावर दबावही आणला गेला. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास नकार …

Read More »

अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

  मुंबई : “अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून अजित पवार मुख्यमंत्री …

Read More »

महिलांना रोजगार देण्याकरिता एंजल फाउंडेशनने घेतला पुढाकार

  बेळगाव : महिलांना काम मिळावे तसेच त्यानी घराबाहेर पडून आपल्या पायावर उभे राहावे. या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकाम, विणकाम तसेच पापड तयार करणे याशिवाय विविध कामांविषयी माहिती देण्यात आली. सर्व महिलांना रोजगार मिळावा याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी शहरांमध्ये महिलांना रोजगार देण्याकरिता बैठका सुरू केल्या …

Read More »

घराची भिंत कोसळून अथणी येथे तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. काशिनाथ आप्पासाबा सुतार (वय 23, रा. तासे गल्ली, बेळगाव जिल्ह्यातील अथणी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळून तरुणाच्या अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अथणीचे पीएसआय व सीपीआय घटनास्थळी भेट देऊन …

Read More »

खानापूरच्या मलप्रभा नदीवरील यडोगा बंधाऱ्याला धोका

  खानापूर : गेल्या आठ दहा दिवासापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. मलप्रभा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. जांबोटी, कणकुंबी भागात पावसाचा जोर वाढला. तसे मलप्रभा नदीचे पात्र मर्यादेपेक्षा जास्त प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …

Read More »

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना उद्या सुट्टी

  बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावरील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रासह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (ता. 27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

धामणे ग्रा. पं. पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे विजयी

  बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5च्या पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजय संपादन केला आहे. धामणे ग्रामपंचायतच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5 ची पोटनिवडणूक गेल्या रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी 951 पैकी 810 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर आज बुधवारी या निवडणुकीचा …

Read More »

पाण्याखाली येणाऱ्या नदीकाठच्या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील हवामान आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांबाबत त्यांनी आज बुधवारी (26 जुलै) सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत …

Read More »

जिल्ह्यातील धबधब्यांच्या भेटींवर निर्बंध : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला जिल्ह्यातील सर्व पाण्याच्या धबधब्याजवळ जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. धबधब्याजवळ येताना फूटपाथ कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यभरात नोंदल्या जात आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले …

Read More »

गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलत द्या

  मध्यवर्ती महामंडळाची मागणी; पालकमंत्री जारकीहोळींना निवेदन बेळगाव : हेस्कॉमने वीजदरात मोठी वाढ केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाबाबत लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »