Monday , September 21 2026
Breaking News

धामणे ग्रा. पं. पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे विजयी

Spread the love

 

बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5च्या पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजय संपादन केला आहे.

धामणे ग्रामपंचायतच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5 ची पोटनिवडणूक गेल्या रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी
951 पैकी 810 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर आज बुधवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये यल्लाप्पा रेमानाचे हे 346 मते घेऊन विजयी झाले. बाळू मरगानाचे यांना 294 मते, तर मुस्ताक कोडलवड यांना 156 मते पडली. याखेरीज 14 मते बाद झाली. यल्लाप्पा रेमानाचे यांनी तिसऱ्यांदा या वार्डातून विजय मिळवीला आहे. आपल्याला विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार मानले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *