Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातच आज खानापूर तालुक्यातील तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग लाटगावकर (वय 61) यांचा ख्रिश्चन वाडा गावाजवळील शेतात ट्रॅक्टरने माती काढत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती …

Read More »

पास्टोली, गवाळी नागरिकांच्या नशीबी आजही आडीचाच आधार

खानापूर : खानापूर तालुका म्हणजे अतिजंगलाने व्यापलेला तालुका, त्यातच मुसळधार पावसाचा तालुका. त्यामुळे तालुक्याच्या जंगल भागाच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान खुप कष्टाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी सुध्दा खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, गावच्या नागरिकांना अजुनही रस्ता नाही. पावसाळ्यात नदी, नाल्यातून येण्यासाठी पुल नाही. पावसाळा आला की या भागातील …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी

  बंगळुरू : उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना कर्नाटकात घडलेली आहे. न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला (पीआरओ) फोनद्वारे ही धमकी देण्यात आली असून, धमकीचा मॅसेजही व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला. कर्नाटक उच्च न्यायालयाचे पीआरओ के. मुरलीधर यांनी यासंदर्भात बंगळुरु पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १२ …

Read More »

खानापूर तालुक्यातील अंगणवाडी अर्जदारांची गुरुवारी बैठक

खानापूर : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ४९ आणि मदतनिसांच्या ८४ जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक उद्या

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक-उद्या बुधवार दि. २६ रोजी होणार आहे. अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी आहे तर उपाध्यक्षपद सामान्यसाठी आले आहे. ग्रामपंचायतवर म. ए. समितीची सत्ता आहे. त्यामुळे समितीच्या उमेदवार अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. सध्या म. ए. समितीचे १७ सदस्य आहेत. तर भाजपचे दहा आणि काँग्रेसचे …

Read More »

देवरवाडी येथे चंदगड पोलिसांची कारवाई, संशयित ताब्यात

  चंदगड : कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थाननजीक रविवारी रात्री 2 लाख 32 हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली असून बेळगावमधील एकाला ताब्यात घेतले आहे. सतीश यल्लप्पा बुरडी (रा. लक्ष्मी गल्ली, बुडर्‍यानुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे. बेळगावमधून देवरवाडी येथे विक्रीसाठी मोठा …

Read More »

निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. निलेश कुलथे

  येळ्ळूर : सर्व थरातील मानवी जीवनात तणाव वाढलेला आहे. त्याचबरोबर चमचमीत आणि तयार खाद्य पदार्थांची रोजच्या आहारात वाढ झालेली आहेत. त्याच बरोबर अनेकांना अनेक प्रकारची व्यसने आहेत. त्यामुळे शरिरामध्ये अनेक आंतरश्वाव्यात अनिचमितता येवून अवयवामध्ये बिघाड होत आहे. याबद्दलचे सविस्तर विवेचन “माधवबाग” मुंबई विभागाचे मेडीकल हेड डॉ. निलेश कुलथे यांनी …

Read More »

पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय, दुसरा कसोटी सामना अनिर्णित, भारताने मालिका जिंकली

  पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आहे. पाचव्या दिवशी सकाळपासूनच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे पावसाने हजेरी लावली. दोन सत्रांचा खेळ संपला तरी पावसान थांबायचं नाव घेतले नाही. त्यानंतर अखेर पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी …

Read More »

यरनाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी लक्ष्मीबाई कांबळे तर उपाध्यक्षपदी दिग्विजय निंबाळकर

  निपाणी (वार्ता) : तवंदी, अंमलझरी, गव्हाण आणि यरनाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अंमलझरीच्या लक्ष्मीबाई आकाराम कांबळे तर उपाध्यक्षपदी यरनाळ येथील दिग्विजय निंबाळकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी नगरपालिकेचे आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी काम पाहिले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. नूतन अध्यक्ष लक्ष्मीबाई कांबळे यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त …

Read More »

जत्राट ग्रामपंचायत अध्यक्ष राणीताई कांबळे यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : जत्राट येथील ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा राणीताई राघवेंद्र कांबळे यांचा निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फौंडेशन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षा कांबळे यांनी साकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जनतेच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी स्वतः लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जत्राट ग्रामस्थांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी …

Read More »