Monday , September 21 2026
Breaking News

तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातच आज खानापूर तालुक्यातील तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग लाटगावकर (वय 61) यांचा ख्रिश्चन वाडा गावाजवळील शेतात ट्रॅक्टरने माती काढत असताना ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग लाटगावकर (वय 61) हे ट्रॅक्टर घेऊन ख्रिश्चन वाड्यावरील आपल्या शेतात गेले होते. ट्रॅक्टर चालवत असताना अचानक समोरील ट्रॅक्टरचे इंजिन उचलून उलटले व इंजिनखाली सापडले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पांडुरंग लाटगावकर हे वर्षभरापूर्वीच शिक्षक सेवेतून निवृत्त झाले होते. तालुक्यातील तेरेगाळी येथील शाळेत त्यांनी अनेक वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतः शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला. आज अचानक बंधाऱ्यावर जमिनीची कापणी करण्यासाठी जात असताना सदर ट्रॅक्टर उलटला आणि त्याखाली निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच  खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले आणि लाटगावकर यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *