Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

जैन मुनींच्या हत्येप्रकरणी भाजप आमदाराचे विधानसौध समोर आंदोलन

  बंगळुरू : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील प्रसिद्ध जैन मुनी १००८ कामकुमार स्वामीजी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी. तसेच संबंधितावर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यात संत महात्मे व हिंदू कार्यकर्त्यावर होणारे अन्याय थांबवावे. अशा विविध मागण्यासाठी कर्नाटक राज्यातील भाजपच्या आमदारांनी बेंगलोर विधानसौध समोरील गांधीजींच्या पुतळ्यापासून राजभवनापर्यत तीव्र मोर्चा …

Read More »

बोरगाव टेक्स्टाईल धारकांच्या समस्या मार्गी लावा

  वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांचा आदेश; वस्त्रोद्योग व्यवसायिकातून समाधान निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी या वस्त्रोद्योग नगरीच्या धर्तीवर बोरगाव येथे मोठे टेक्सटाईल पार्क उभारण्यात आले आहे. या टेक्स्टाईल पार्कमधील उद्योग धारकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या त्वरित मार्गी लावून त्यांना उद्योग निर्मितीसाठी मुभा मिळवून द्या, असा आदेश वस्त्रोद्योग …

Read More »

लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप

  खानापूर : आई-वडील आपल्या मुलांना चांगले वळण लागावे, आपल्या मुलांनी वामार्गाला लागू नये म्हणून आपल्याला बोलत असतात. तेव्हा मुलांनी आपल्या आई वडिलांना परत उत्तर देऊ नये. कोणत्याही व्यसनापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करावा, असे प्रतिपादन बेळगाव येथील इंडाल कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अभियंता विजय मन्नूरकर यांनी केले. मनगुती येथील दक्षिण …

Read More »

बेळगाव पोलीस आयुक्त पदी एस. एन. सिद्धरामाप्पा यांची वर्णी

  बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तपदी एस एन सिद्धरामाप्पा यांची नियुक्ती करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सिद्धरामाप्पा हे 2005सालच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत. बेळगाव शहर पोलिस आयुक्त हे पद आय जी पी शी समान आहे असेही राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात म्हटले आहे. मागील महिन्यात पोलीस आयुक्त डॉ एम …

Read More »

अजित पवारांचा गट तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ

  मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा तिढा हा काही केल्या सुटायला तयार नाही. मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरुन सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित …

Read More »

अलतग्याला वस्तीची बस सोडा : कंग्राळी खुर्द ग्रा. पं. ची मागणी

  बेळगाव : गावकरी आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी सीबीटी ते अलतगा अशी कायमस्वरूपी वस्तीची बससेवा सुरू करावी अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या …

Read More »

दोषींवर कठोर कारवाईसह मुनी महाराजांना सुरक्षा द्या

  लक्ष्मीसेन महाराज; निपाणीत मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात साधुसंत आणि मुनी महाराजांच्या वर हल्ले वाढले आहेत. ही बाब खेदजनक अशीच आहे. हिरेकुडी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह साधु, संत, मुनी महाराजांना शासनाने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कोल्हापूर …

Read More »

हिमाचल-उत्तराखंडमध्ये ‘जलप्रलय’ तर, पंजाब- हरियाणात 15 जणांचा पावसामुळे मृत्यू

  नवी दिल्ली : देशभरात पावसाने यावेळी कहर केला आहे. हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विध्वंसानंतर मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले असून एनडीआरएफच्या …

Read More »

बापाकडून मोठ्या मुलाच्या मदतीने छोट्या मुलाचा खून

  बेळगाव : मद्यपी मुलाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या बाप-लेकाला हारुगेरी पोलिसांनी अटक केली. ८ जुलै रोजी घडलेल्या या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावला. सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४, रा. हिडकल, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा वडील महालिंगय्या गुरुसिद्धय्या हिरेमठ (वय ५४) व …

Read More »

श्री मंगाई देवी यात्रा भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत वडगाव मंगाई देवीची एकदिवसीय वार्षिक यात्रा उत्साहात झाली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बेळगाव शहर, उपनगरांतून भाविकांनी गर्दी केली होती. मंगाई देवस्थानचे हक्कदार चव्हाण पाटील परिवार, मनपा चव्हाण-पाटील प्रशासनाच्या नियोजनाने पोलिसांच्या बंदोबस्तात यात्रा सुरळीत पार पडली. मंगळवारी सकाळी १० वा. धनगरी वाद्यांच्या गजरात वडगाव परिसरातील यल्लम्मा …

Read More »