Saturday , November 7 2026
Breaking News

बापाकडून मोठ्या मुलाच्या मदतीने छोट्या मुलाचा खून

Spread the love

 

बेळगाव : मद्यपी मुलाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या बाप-लेकाला हारुगेरी पोलिसांनी अटक केली. ८ जुलै रोजी घडलेल्या या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावला.

सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४, रा. हिडकल, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा वडील महालिंगय्या गुरुसिद्धय्या हिरेमठ (वय ५४) व भाऊ बसय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २६) यांना अटक झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोमय्याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तो घरच्यांशी भांडण काढून त्रास द्यायचा. या त्रासाला घरचेही कंटाळले होते. ८ जुलै रोजी म्हणजे शनिवारी सोमय्या व घरच्या लोकांमध्ये जोराचे भांडण झाले. त्यावेळी वडील महालिंगय्या व मोठा मुलगा बसय्या यांनी सोमय्याच्या डोक्यात काठीने जोराचा प्रहार केला. त्यात सोमय्या जागीच मृत पावला. तो मृत झाल्याचे लक्षात येतात बाप- लेकाने घाईने मृतदेह येऊन त्याला अग्नी दिला.
त्यानंतर दोन दिवसांनी मुलाने व बापाने मिळून आपल्या दुसऱ्या मुलाला मारल्याची चर्चा गावात सुरू झाली. यामुळे पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला. त्यावेळी दोघांनी मिळून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर ज्या ठिकाणी सोमय्याला जाळण्यात आले होते, तेथून हाडाचे अवशेष मिळवून पोलिसांनी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हारुगिरीचे पोलिस निरीक्षक रविचंद्र डी. तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *