Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

शहापूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा २८ जुलैपासून

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक दैवज्ञ यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा शुक्रवार दि. २८ जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धा १५ दिवस चालणार आहेत. स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध मैदानांवर आयोजन कण्यात आले आहे. १० ऑगस्टपर्यंत विभागीय स्पर्धा संपून तालुका स्पर्धा होणार आहे, अशी …

Read More »

मुंबईतील जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय पंतबाळेकुंद्री सन्मानित

  निपाणी (वार्ता) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल श्री पंतभक्त मंडळ मुंबई, यांच्यामार्फत अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना सन २०२३ सालचा जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी काळाचौकी- मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावर्षी शैक्षणिक …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुलीस सर्व थरातून विरोध

  खानापूर : खानापूर- बेळगाव महामार्गावर गणेबैल येथे उद्या मंगळवार दिनांक 11 जुलैपासून टोल वसुली करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेबैल ते झाडशहापूर जवळपास 12 किलोमीटरचा रस्ता अजून पूर्णत्वास आलेला नाही. काही …

Read More »

उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी ३१ जुलै रोजी निवडणूक

  बेळगाव : उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी असणारा ३० महिन्याचा कालावधी (अडिच वर्षे) पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या पदासाठी सोमवार दि. ३१ जुलै रोजी निवडणूक होणार असून इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.. उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्षपद हे महिला सर्वसामान्य …

Read More »

मंगाई देवीची यात्रेची जय्यत तयारी

  बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून बेळगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. ११ रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. वडगाव परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यासोबतच खेळण्यांची दुकाने, आकाश पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, मिठाई दुकाने सजली आहेत. बेळगाव परिसरातील सर्वात …

Read More »

पत्रकारांसाठी बेळगाव महानगरपालिकेतर्फे आरोग्य विमा

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतर्फे कार्यरत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा सुविधा कार्डचे महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महापालिका सभागृहात आज सोमवारी (10 जून) एकूण 88 पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य विमा कंपनीच्या प्रतिनिधी श्रीकांत गुणारी यांनी सांगितले की, काही …

Read More »

जैन मुनींना एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

  बेळगाव : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा निषेधार्ह व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी मांजरी ता. चिक्कोडी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने मांजरी बस स्थानकाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भावप्रतिमेचे पुजा डॉ. …

Read More »

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सीआयटीयू कार्यकर्त्यांचे आंदोलन

  बेळगाव : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, जुने मोबाईल परत करावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी सोमवारी सीआयटीयू कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथून आंदोलन करून महिला व बालकल्याण विभागाच्या उपसंचालकांना निवेदन दिले. मागील सरकारमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ते आजतागायत प्रत्यक्षात आलेले नाही. तसेच ते सर्व …

Read More »

घटप्रभा नदी पात्रातून दोन दुचाकीस्वार गेले वाहून

  बेळगाव : घटप्रभा नदीच्या पात्रात दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा ताबा सुटल्याने ते नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आवराडी गावातील चेन्नप्पा (30) आणि दुर्गव्वा (25) हे दोघे …

Read More »

हिरेकुडी मुनीश्रींच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ११) जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील …

Read More »